HAL Recruitment 2024 : सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या १० वी पास उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)ने ऑपरेटर पदाच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीसाठी उमेदवार ३० जून २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवार hal-india.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला अर्ज भरू शकतील. पण, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज शुल्कासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्यावी.

एकूण रिक्त पदे – ५८ जागा

एचएएलमधील भरती प्रक्रियेद्वारे एकूण ५८ पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. या पदभरती प्रक्रियेमधील रिक्त जागांबाबतचा तपशील खालीलप्रमाणे :

१) ऑपरेटर (सिव्हिल) – ०२
२) ऑपरेटर (इलेक्ट्रिकल) – १४
३) ऑपरेटर (इलेक्ट्रॉनिक्स)- ०६
४) ऑपरेटर (मेकॅनिकल)- ०६
५) ऑपरेटर (फिटर)- २६
६) ऑपरेटर (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) – ०४

शैक्षणिक पात्रता :

१) पहिल्या १ ते ४ पदांसाठी अर्ज करण्यासाठी १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, यासह Civil/Electrical/Electronics / Electronics & Tele Communication / Electronics & Communication/Mechanical यापैकी कोणत्याही डिप्लोमा कोर्समध्ये ६० टक्क्यांसह उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. यात SC /ST/PWD प्रवर्गातील उमेदवार ५० टक्क्यांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

२) ५ व ६ व्या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार १० उत्तीर्ण असावा. त्यासह Fitter/Electronics Mechanic या ITI संबंधीत डिप्लोमा कोर्समध्ये ६० टक्क्यांसह उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्यात SC /ST/PWD प्रवर्गातील उमेदवार ५० टक्क्यांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)मधील रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा २५ मे २०२४ रोजीपर्यंत १८ ते २८ वर्षेपर्यंत असावी. त्यात एसटी आणि एससी प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षे, तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अर्ज शुल्क :

उमेदवारांकडून कुठलेही अर्ज शुुल्क घेतले जाणार नाही.

नोकरीचे ठिकाण

नाशिक

महत्त्वाच्या तारखा

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जून २०२४

लेखी परीक्षा : १४ जुलै २०२४

अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या लिंक्स खालीलप्रमाणे

१) अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

hal-india.co.in

२) अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

HAL Recruitment 2024 Advertisement

३) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

https://optnsk.reg.org.in/