Are you just Meant For 9 to 5 Job : ९ ते ५ नोकरी करून तु्म्ही कंटाळला आहात का? दररोज डेडलाइनच्या मागे धावा, मनासारखा पगारवाढ नाही पण कामाचा वाढलेला लोड, इच्छा असूनही नोकरी सोडायचा निर्णय घेता न येणे, यामध्ये तुम्ही अडकले आहात का? एकदिवस सर्व काही नीट होईल, या अपेक्षेने तुम्ही मन मारून काम करता का? खरं तर तुम्ही ९-५ नोकरीसाठी बनला आहात का, हे स्वत:ला आधी विचारा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की '९ ते ५'च्या नोकरी आपल्यासाठी सोयीस्कर आहे की नाही, हे कसं ओळखायचं? आज आपण त्या विषयी सविस्तर जाणून घेऊ या. (how to identify that are you just Meant For A 9 to 5 Desk Job or not that five signs help you) हेही वाचा : Success Story : वडील अभिनय क्षेत्रात अन् लेकराने निवडला यूपीएससीचा मार्ग; समजून घ्या असा झाला परीक्षा पास होऊन IAS अधिकारी; वाचा प्रवास तुमचे मन तुम्हाला सतत सांगते, की तुम्ही येथे वेळ घालवत आहात आणि तुमच्या क्षमतेचा पूर्ण वापर कसा करत नाही. तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे, असा प्रश्न तुम्हाला सतत पडतो. तुम्ही आठ नऊ तास एकाच जागी काम करता, तेव्हा तुम्हाला निराश वाटते. तुम्ही जितका वेळ बसून काम करता, तितक्या वेळ तुम्हाला असे वाटते की तुम्ही यापेक्षा आणखी चांगले काहीतरी करू शकता. तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास भाग पाडतात. तुम्हाला ८-९ केलेल्या कामाचा आनंद वाटत नाही. हेही वाचा : स्कॉलरशिप फेलोशिप: ‘टीच फॉर इंडिया फेलोशिप’; शिक्षण क्षेत्रातील बदल घडवू पाहणाऱ्यांसाठीची अभ्यासपूर्ण फेलोशिप तुम्हाला ऑफिसमधील औपचारिकता आवडत नाही. तु्म्हाला मुक्त वातावरणात काम करण्याची इच्छा असते. मनाप्रमाणे वागणे व बोलणे तुम्हाला आवडते. कामावर जाताना प्रवास करणे तुम्हाला आवडत नाही. कामावर जाण्याचा विचार केला की तुम्हाला आजारी पडल्याची मनात भावना येते. कामावर गेल्यानंतर तुमचे मन स्थिर नसते. तुमच्या लॅपटॉवर कामाव्यतिरिक्त १० इतर टॅब्स उघडे असतात ज्यामध्ये सोशल मिडिया, चांगले लेख किंवा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींचा समावेश असतो. कामातून ब्रेक घेत तुम्ही या गोष्टी बघत असता. खरं तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आतून खूप जास्त वैतागलेले असता पण तुम्ही ते मान्य करत नाही.