CISCE ISC Class 12, ICSE Class 10 Result 2025 : काऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेशनतर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या दहावी (आयसीएसई) आणि बारावी (आयएससी) विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे, कारण सीआयएससीईने १० वीच्या आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल cisce.org या अधिकृत वेबसाइटवर पाहता येतील.
दहावी (आयसीएसई) निकाल ९९.०९ टक्के लागला आहे, तर बारावी (आयएससी) मध्ये उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.०२ टक्के आहे. आयसीएसईमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे आणि आयसीएसई दहावीच्या परीक्षेत ९९.३७ टक्के मुली, तर ९९.८४ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.
दहावी (आयसीएसई) बोर्डाच्या १० वीच्या परीक्षा १८ फेब्रुवारी ते २७ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या, तर १२ वीच्या परीक्षा १३ फेब्रुवारी ते ५ एप्रिल २०२५ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. तर विद्यार्थी खाली दिलेल्या स्टेप्सचा वापर करून निकाल पाहू शकतात…
असा पाहा आयसीएसई बोर्डाचा २०२५ चा १० वीचा निकाल (How To Check & Download ICSE Board Result 2025)
- निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cisce.org ला भेट द्या.
- त्यानंतर ज्या वर्गाचा निकाल तुम्हाला तपासायचा आहे त्यावर क्लिक करा.
- तुमचा रोल नंबर एंटर करा आणि सबमिट करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- विद्यार्थ्यांनी निकाल तपासल्यानंतर तो ते डाउनलोडदेखील करू शकतात.
इंटरनेटशिवाय CISCE ICSE बोर्ड निकाल कसा पहायचा?
विद्यार्थी त्यांचा CISCE १० वी ICSE बोर्डाचा निकाल SMS द्वारे पाहू शकतात. फक्त तुमचा युनिक आयडी (सात अंकी क्रमांक) लिहा आणि त्यानंतर ICSE लिहा आणि तो 09248082883 वर पाठवा. उदाहरणार्थ जर तुमचा युनिक आयडी 1234567 असेल, तर तुम्ही ICSE 1234567 हा 09248082883 वर पाठवाल. यानंतर तुम्हाला तुमचा निकाल टेक्स्ट मेसेजद्वारे मिळेल.
बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटसोबतच डिजी लॉकरच्या माध्यमातूनसुद्धा निकाल पाहता येणार आहे. CISCE बोर्डाचा १२ वी आणि १० वीचा DigiLocker वर निकाल पाहण्यासाठी digilocker.gov.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला लॉगइन करावे लागेल. यानंतर तुम्हाला CISCE सेक्शनमध्ये जावे लागेल. यानंतर तुम्हाला Get Class X Result किंवा Get Class XII Result वर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा रोल नंबर, शाळेचा नंबर इत्यादी माहिती अपलोड करावी लागेल, यानंतर तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.