Best time for Job Hunting : नोकरी शोधणे, खूप कठीण काम आहे. प्रत्येकाला असं वाटतं की त्यांना मनाप्रमाणे नोकरी मिळावी पण आजच्या स्पर्धात्मक जगात नोकरी शोधण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. तुमचा रेझ्युमे वेळोवेळी अपडेट करणे, तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा, हे ठरविणे आणि त्यावर संशोधन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

तुम्हाला माहीत आहे का, नोकरी शोधण्यासाठी वेळ हा महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही केव्हा नोकरी शोधता, हे खूप महत्त्वाचे आहे. योग्य वेळी नोकरी शोधल्यामुळे नोकरी मिळण्याची शक्यता जास्त असते. आज आपण बारा महिन्यांमध्ये कोणत्या महिन्यात नोकरी शोधावी, याविषयी सांगणार आहोत.

जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च (चांगला वेळ)

ज्या कंपन्यांचे आर्थिक वर्ष जानेवारीमध्ये सुरू होते आणि डिसेंबरमध्ये संपते, अशा कंपन्यामध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची ही योग्य वेळ आहे. अनेक मल्टी नॅशनल कंपनीमध्ये तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये संधीशोधल्या पाहिजेत कारण हीच वेळ असते जेव्हा वार्षिक आर्थिक बजेट ठरवले जाते आणि पुढील वर्षाच्या गरजांची प्लॅनिंग केली जाते.

हेही वाचा : Success Story: महिन्याला ८० रुपये कमावण्यापासून ते वर्षाला आठ कोटी कमावण्यापर्यंतचा प्रवास; देशी गायींच्या जोरावर केली प्रगती

एप्रिल, मे आणि जून (सर्वोत्तम वेळ)

ज्या कंपन्यांमध्ये आर्थिक वर्ष मार्चमध्ये संपते, विशेषत: भारतीय मालकीच्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी हा कालावधी उत्तम आहे. बऱ्याच संस्था त्यांच्या कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्षाच्या अखेरीस वार्षिक लाभ किंवा बोनस देतात, याचा अर्थ जे नोकरी सोडायचा विचार करत असतील त्यांना आर्थिक लाभ मिळाल्यानंतर नोकरी सोडू शकतात.

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर ( चांगली वेळ नाही)

नवीन नोकरी शोधण्यासाठी वर्षातील जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना फार चांगला नाही. कारण बहुतेक कंपन्या वर्षाच्या सुरुवातीला रिक्त जागा भरतात. या काळात नोकरी सोडण्याची शक्यता कमी असते. जोपर्यंत तुमच्यावर जास्त दबाव येत नाही किंवा तुम्हाला खूप चांगली ऑफर मिळत नाही, तोवर तुम्ही नवी नोकरीचा विचार करत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर (चांगला वेळ नाही आणि वाईट वेळ पण नाही)

ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हा सणांचा कालावधी आहे दसरा, दिवाळी, ख्रिसमस, नवीन वर्ष इत्यादी सणांमध्ये लोक सणांचा आनंद घेतात. कर्मचारी सुट्या घेतात. काम जवळपास थांबलेले असते. वर्ष संपत आल्याने कंपनी पुढील वर्षाचे नियोजन करत असते.