India Post Bharti 2023: इंडिया पोस्टने बंपर पदासाठी भरती काढली आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे १० वी आणि १२ वी उत्तीर्ण उमेदवार त्यांच्यासाठी अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेअंतर्गत, भारतीय पोस्टमध्ये ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्टमास्तर आणि सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर ही पदे भरली जातील. या ४०८८९ रिक्त जागांसाठी फक्त ऑनलाइन अर्ज करता येईल. अर्ज करण्यासाठी तुम्ही या वेबसाइटला तुम्ही indiapostgdsonline.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकता. नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे हे देखील जाणून घ्या. तुम्ही या पदासाठी इच्छुक असाल तर वेबसाइटला भेट देऊन फॉर्म भरू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या

इंडिया पोस्ट रिक्रूटमेंट २०२३ अंतर्गत या पदांसाठीचे अर्ज २७ जानेवारी २०२३ पासून सुरू झाले आहेत. आजपासून सुरू झालेले हे अर्ज १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत चालतील. म्हणजेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी आहे.

( हे ही वाचा: Union Bank of India Recruitment 2023: विविध पदांसाठी मोठी भरती; अर्ज भरण्याची शेवटची तारीख जाणून घ्या)

इतर महत्वाची माहिती

  • या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • दहावीमध्ये गणित आणि इंग्रजी हे अनिवार्य विषय असावेत. यासोबतच उमेदवाराने माध्यमिक वर्गापर्यंत स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असावा.
  • या पदांसाठी वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित वर्गाला सरकारी नियमांनुसार वयात सवलत मिळेल.
  • या रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्तेद्वारे केली जाईल. उमेदवारांची गुणवत्ता १० वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल आणि त्यानंतर निवड केली जाईल.
  • अर्ज फक्त ऑनलाइनच स्वीकारले जातील. इतर कोणत्याही माध्यमातून केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • या पदांसाठी निवडलेली अंतिम यादी ३० जून २०३३ पर्यंत प्रसिद्ध केली जाईल.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India post recruitment 2023 apply at indiapostonline gov in from 27 january gps
First published on: 27-01-2023 at 17:52 IST