Loco Pilot Recruitment 2024 : भारतीय रेल्वे विभागांतर्गत २० जानेवारी २०२४ पासून मोठ्या प्रमाणावर भरती सुरू झालेली आहे. ‘सहायक लोको पायलट’ [Assistant Loco Pilot] या पदासाठी एकूण ५,६९६ रिक्त जागांवर भरती सुरू आहे. ज्या उमेदवारांना या नोकरीसाठी अर्ज करायची इच्छा आहे, त्यांनी तो ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी भारतीय रेल्वेच्या https://indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १९ फेब्रुवारी २०२४ ठेवण्यात आलेली आहे.

भारतीय रेल्वे विभागांतर्गत ‘सहायक लोको पायलट’ पदासाठी कोण अर्ज करू शकतो, ते जाणून घ्या. तसेच या पदासाठी शैक्षणिक पात्रता, वेतन आणि अर्ज करण्याची प्रक्रिया यांबद्दल माहिती घेऊ.

indian railways irctc rpf caught 21 people in ac coach without tickets from bhagalpur district of bihar
रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करताय? मग ‘हा’ VIDEO पाहाच, तुम्हालाही भरावा लागू शकतो ‘इतका’ दंड
kalyan ac local latest marathi news
कल्याण, बदलापूर, टिटवाळा गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने पासधारक प्रवासी त्रस्त
SAI recruitment 2024 job post
SAI recruitment 2024: भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरीची संधी! मिळणार ‘इतक्या’ लाखांचा पगार…
indian army 140th technical graduate course Apply Online for 30 Officers Posts, Check Notification and Eligibility
भारतीय सैन्यात नोकरीची संधी! तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी ‘इतक्या’ पदांची भरती; असा करा अर्ज

हेही वाचा : KVK Baramati recruitment 2024 : कृषी विज्ञान केंद्रात ‘दहावी पास’ उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

Loco Pilot Recruitment 2024 – अर्ज करण्यासाठी थेट लिंक –
https://www.recruitmentrrb.in/#/auth/landing

Loco Pilot Recruitment 2024 – अधिसूचना –
https://drive.google.com/file/d/1FZ0nTTPTlAjJG1iaMwh-wN2jvYRgyWmK/view

Loco Pilot Recruitment 2024 : पात्रता निकष

१. वयोमर्यादा

सहायक लोको पायलट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे १८ ते ३० वर्षांमधील असणे आवश्यक आहे.

२. शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडे किमान दहावीपर्यंतचे शिक्षण अथवा एसएसएलसी प्लस आयटीआय [Matriculation / SSLC plus ITI (१० वी / ITI)] असे शिक्षण असणे आवश्यक आहे.

३. रिक्त पदे

भारतीय रेल्वे विभाग – सहायक लोको पायलट – या पदासाठी एकूण पाच हजार ६९६ पदे रिक्त आहेत.

४. वेतन

भारतीय रेल्वे विभाग – सहायक लोको पायलट – सुरुवातीला या पदावर भरती झालेल्या व्यक्तीला १९,९०० रुपये इतके वेतन मिळेल.

हेही वाचा : Punjab National Bank recruitment 2024 : पंजाब नॅशनल बँकेमध्ये १०२५ जागांसाठी भरती; जाणून घ्या अधिक माहिती

५. ऑनलाइन अर्ज करणे

भारतीय रेल्वे विभागांतर्गत सहायक लोको पायलट या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
त्यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा वर दिलेल्या ‘अर्ज करण्याच्या थेट ‘लिंक’वर जाऊन आपला अर्ज भरावा.
त्यासाठी उमेदवारास सर्वप्रथम लिंकवर जाऊन स्वतःचे अकाउंट बनवावे लागेल. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करावी.
अर्ज भरताना आपली सर्व माहिती योग्य आणि अचूकपणे भरावी.
अर्ज जमा (सबमिट) करण्यापूर्वी पुन्हा सर्व रकाने तपासून, माहिती योग्य रीतीने भरले गेल्याची खात्री करावी.
अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १९ फेब्रुवारी २०२४ आहे.
अंतिम तारखेनंतर उमेदवारांनी अर्ज केल्यास, तो ग्राह्य मानला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

सहायक लोको पायलट या भरतीसंबंधी इच्छुक उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास वर नमूद केलेली अधिसूचना वाचावी.