ICT Mumbai Bharti 2024: इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी - मुंबई अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. त्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध पदांच्या एकूण ११३ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. तसेच अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १६ एप्रिल असणार आहे. ICT Mumbai Bharti 2024: भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे आणि पदसंख्या, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण यांबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ. रिक्त पदे आणि पदसंख्या -प्रोफेसर - ७, असोसिएट प्रोफेसर - १३, असिस्टंट प्रोफेसर - ४१, प्रशासकीय पदे - १२, ग्रंथालयातील पदे - ३, संस्था स्तरावरील पदे - १, संस्था प्रयोगशाळांमधील - २५, संस्था कार्यशाळेतील पदे - ११ आदी ११३ रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात आली आहे. नोकरी ठिकाण - मुंबई वयोमर्यादा - ५५ वर्षे शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून, प्रयोगशाळा अटेंडन्ट पदासाठी अर्ज करणारा उमेदवार विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण असावा; तर प्रयोगशाळा असिस्टंट पदासाठीचा उमेदवार विज्ञान शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. हेही वाचा.Thane Police Bharti 2024 : पोलीस विभागात नोकरी करण्याची संधी! बारावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज, जाणून घ्या सविस्तर पात्र उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.लिंक - अशा प्रकारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.