ISRO Recruitment 2025: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि संगणक विज्ञान या विषयांमध्ये शास्त्रज्ञ/अभियंता ‘एससी’ पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार या पदांसाठी १९ मे २०२५ पर्यंत isro.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.
या भरती मोहिमेचे उद्दिष्ट ६३ रिक्त जागा भरण्याचे आहे, त्यापैकी २२ रिक्त जागा शास्त्रज्ञ/अभियंता ‘एससी’ (इलेक्ट्रॉनिक्स), ३३ रिक्त जागा शास्त्रज्ञ/अभियंता ‘एससी’ (मेकॅनिकल) आणि ०८ रिक्त जागा शास्त्रज्ञ/अभियंता ‘एससी’ (कॉम्प्युटर सायन्स) आहेत. उमेदवार खालील अधिसूचनेमध्ये उपलब्ध असलेले पात्रता निकष, वयोमर्यादा, वेतनमान आणि इतर तपशील तपासू शकतात:
ISRO Recruitment 2025: अर्ज शुल्क
अर्जदारांना २५० रुपये शुल्क भरावे लागेल. सर्व महिला/अनुसूचित जाती (SC)/अनुसूचित जमाती (ST); माजी सैनिक [EX] आणि बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती (PwBD) उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
ISRO Recruitment Application Process: इस्त्रोमधील नोकरीसाठी अर्ज कसा करावा?
- isro.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- होमपेजवर, शास्त्रज्ञ/अभियंता नोंदणी लिंकवर क्लिक करा
- नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रिया सुरू करा
- फॉर्म भरा, फी भरा आणि फॉर्म सबमिट करा
- भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या
ISRO Recruitment 2025: वयोमर्यादा
इस्त्रोमधील या नोकरीसाठी १८ ते २८ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, मेकॅनिकल किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये BE/BTech डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत उमेदवाराकडे GATE स्कोर असणे गरजेचे आहे.