​J​​NU Recruitment 2023: ​जवाहरलाल नेहरु विद्यापीठ हे दिल्लीमध्ये स्थित आहे. देशातील सर्वात्तम विद्यापीठांमध्ये ‘जेएनयू’चा समावेश होतो. या विद्यापीठामधून अनेक दिग्गज शिकून मोठे झाले आहेत. नुकतीच जेएनयूमधील विविध पदांसाठी भरती होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या भरतीला सुरुवात झाली असून त्यातील जागांसाठी अर्ज करायची शेवटची तारीख १० मार्च २०२३ आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठामधील ३८८ जागांसाठी ही भरती होणार आहे. तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असल्यास jnu.ac.in ही वेबसाईट सर्च करा. तेथे तुम्हाला रिक्त जागांसंबंधित सर्व माहिती मिळू शकेल. याच साईटवरुन तुम्ही विशिष्ट जागेसाठी अर्ज देखील करु शकता.

जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये डिप्यूटी रजिस्ट्रारच्या २ जागा, सहाय्यक रजिस्ट्रारच्या ३ जागा, सेक्शन ऑफिसरच्या ८ जागा, सीनिअर असिस्टंटच्या ८ जागा, सहाय्यक असिस्टंटच्या ३ जागा, खासगी असिस्टंटच्या ६ जागा उपलब्ध आहेत. त्यासह स्टेनोग्राफरसाठीची २२ पदे, रिसर्च ऑफिसर्सची २ पदे, संपादक प्रकाशकाची २ पदे रिक्त आहेत. सेमी प्रोफेशनल असिस्टंटच्या ८ जागा, आचाऱ्यांसाठीच्या १९ जागा, मेस हेल्परच्या ४९ जागा, ज्यू. असिस्टंटच्या १०६ जागा, मल्टी टास्किंग स्टाफच्या ७९ जागा, वर्क्स असिस्टंटच्या १६ जागा, इंजिनिअरींग असिस्टंच्या २२ जागा, लिफ्ट ऑपरेटरच्या ३ जागा, सिस्टम अ‍ॅनालिस्टच्या २ जागा, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकांसाठीच्या २ जागा, ज्यू, ऑपरेटरच्या २ जागा, स्टॅटिस्टिकल असिस्टंटच्या २ जागा, प्रयोगशाळेतील सहाय्यकाच्या ३ जागा आणि लॅब असिस्टंटच्या २ जागा यांसाठी जेएनयूमध्ये मेगाभरती सुरु आहे.

‘एअर इंडिया’ची लवकरच भरती मोहीम; नवीन ४७० विमानांसाठी ६,५०० हून अधिक वैमानिकांची गरज

याशिवाय जनसंपर्क अधिकारी, खाजगी सचिव, क्युरेटर, ग्रंथपाल असिस्टंट, प्रोफेशनल असिस्टंट, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), ज्यू अभियंता (इलेक्ट्रिकल), सीनिअर सिस्टीम अ‍ॅनालिस्ट, कंम्युटर ऑपरेटर, तांत्रिक सहाय्यक, ज्यू. टेकनिशीअन (CLAR), टेकनिशीअन ए (USIC), असिस्टंट मॅनेजर, कार्टोग्राफिक असिस्टंट, स्टाफ नर्स, स्पोर्ट्स असिस्टंट आणि ज्युनियर ट्रान्सलेट ऑफिसर अशा रिक्त पदांसाठी प्रत्येकी एका व्यक्तीची निवड केली जाणार आहे.

आता दूर होणार नोकरीचं टेन्शन? हे डिप्लोमा कोर्स करा, IT सेक्टरमध्ये नोकरी पक्की, पगारही मिळणार तगडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठराविक जागेसाठी अर्ज करताना काही रक्कम भरावी लागणार आहे. ‘ग्रुप ए’च्या जागांसाठी सामान्य /ईडब्ल्यूएस/ओबीसी श्रेणीमधील व्यक्तींना १५०० रुपये भरावे लागणार आहेत. त्याव्यतिरिक्त अनुसूचित जातीजमाती/ महिला उमेदवार १००० रुपये भरुन येथे अर्ज करु शकतात. ‘ग्रुप बी’च्या सामान्य /ईडब्ल्यूएस/ओबीसी श्रेणीमधील उमेदवारांकडून १००० रुपये तर अनुसूचित जातीजमाती/ महिला उमेदवारांकडून ६०० रुपये आकारले जातील.