सुहास पाटील
इंडियन आर्मीमध्ये अविवाहीत पुरुष/ महिला उमेदवारांकरिता ऑक्टोबर, २०२४ पासून प्री-कमिशनिंग ट्रेनिंग ॲकॅडमी ( PCTA), ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी ( OTA), चेन्नई येथे सुरू होणाऱ्या SSC ( Tech) ट्रेनिंग कोर्ससाठी प्रवेश. एकूण ३७९ पदे. (एसएससी (टेक) पुरुष – ६३ वा कोर्स – ३५० पदे, एसएससी (टेक) महिला – ३४ वा कोर्स – २९ पदे, संरक्षण दलातील सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विधवा – २ पदे) रिक्त पदांचा तपशिल इंजिनीअरिंग स्ट्रीमनुसार पुढीलप्रमाणे –
(१) सिव्हील इंजिनीअरिंग/ बिल्डींग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी/ आर्किटेक्चर – पुरुष – ७५ पदे, महिला – ७ पदे.
(२) कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनीअरिंग/ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी/ M.Sc. कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी – पुरुष – ६० पदे, महिला – ४ पदे.
(३) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्स्ट्रूमेंटेशन/इन्स्ट्रूमेंटेशन – पुरुष – ३३ पदे, महिला – ३ पदे.
(४) इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन/ फायबर ऑप्टिक्स/ टेली कम्युनिकेशन/ मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड मायक्रोवेव्ह/ ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स/सॅटेलाईट कम्युनिकेशन – पुरुष – ६४ पदे, महिला – ६ पदे.
हेही वाचा >>> Government Job: थेट परराष्ट्र मंत्रालयात नोकरीची संधी; परीक्षा न देता मिळणार नोकरी, महिन्याला ७० हजार रुपये पगार
(५) मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ ऑटोमोबाईल/ इंडस्ट्रियल/ इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग/इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग ॲण्ड मॅनेजमेंट/ वर्कशॉप टेक्नॉलॉजी/ एअरोनॉटिकल/ एअरोस्पेस/एव्हिऑनिक्स – पुरुष – १०१ पदे, महिला – ९ पदे.
(६) Misc. इंजिनीअरिंग – प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी/ रिमोट सेन्सिंग/ बॅलिस्टिक्स/ फूड टेक्नॉलॉजी/ अॅग्रिकल्चर/ मेटॅलर्जिकल/ बायोटेक/ टेक्स्टाईल इंजिनीअरिंग इ. – पुरुष – १७ पदे.
पात्रता SSC( Tech) मेन/ वुमन पदांसाठी – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग किंवा समतूल्य पदवी उत्तीर्ण.
(अंतिम वर्षात शिकणारे उमेदवार जे अंतिम परीक्षा १ एप्रिल, २०२४ पर्यंत उत्तीर्ण करू शकतील, अर्ज करण्यास पात्र आहेत.)
संरक्षण दलातील सेवेत असताना कामी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या विधवांसाठी – ( i) SSC ( W) (Non Tech) ( Non UPSC) – १ पद.
पात्रता – पदवी (कोणतीही शाखा), ( ii) SSC ( W) ( Tech) – १ पद. पात्रता – बी.ई./बी.टेक. (कोणतीही शाखा).
वयोमर्यादा – (दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी) २०-२७ वर्षे (उमेदवाराचा जन्म दि. २ ऑक्टोबर १९९७ ते १ ऑक्टोबर २००४ दरम्यानचा असावा.) संरक्षण दलातील सेवेत कामी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या विधवा – ३५ वर्षेपर्यंत.
निवड पद्धती – पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षापर्यंतच्या गुणवत्तेनुसार किंवा अंतिम वर्षात शिकणाऱ्या उमेदवारांच्या ६ व्या सेमिस्टरपर्यंतच्या गुणवत्तेनुसार शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर, वाटप केलेल्या सिलेक्शन सेंटरचे नाव कळविले जाईल. त्यानंतर उमेदवारांनी वेबसाईटवर लॉगइन करून एसएसबीची तारीख निश्चित करावी. (फर्स्ट कम फर्स्ट बेसिस) अलाहाबाद, भोपाळ, बंगलोर, कापूरथळा या सिलेक्शन सेंटरवर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची सायकॉलॉजिस्ट, ग्रुप टेस्टिंग ऑफिसर आणि इंटरह्यूइंग ऑफिसर यांचेकडून एसएसबी इंटरह्यू घेतला जाईल. (एसएसबी इंटरह्यू ५ दिवसांपर्यंत चालेल.) एसएसबीने निवडलेल्या उमेदवारांची मेडिकल टेस्ट घेतली जाईल. यात फिट ठरणाऱ्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार ट्रेनिंगसाठी निवड यादी जाहिर केली जाईल.
ट्रेनिंग – निवडलेल्या उमेदवारांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन ‘लेफ्टनंट’ पदावर नेमले जाईल व त्यांना प्रोबेशनवर ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी, चेन्नई येथे ४९ आठवड्यांचे ट्रेनिंग दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यास उमेदवारांना मद्रास युनिव्हर्सिटीकडून ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स मॅनेजमेंट अॅण्ड स्ट्रटेजिक स्टडिज’ दिला जाईल. लेफ्टनंट पदावर २ वर्ष सेवा पूर्ण केल्यावर कॅप्टन पदावर बढती दिली जाईल. ६ वर्षं पूर्ण केल्यावर ‘मेजर’ पदावर बढती मिळेल. १३ वर्षे पूर्ण केल्यावर लेफ्नंट कर्नल पदावर बढती मिळेल. ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना रु. ५६,१००/- स्टायपेंड दिले जाईल. लागू असलेले इतर भत्ते ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर दिले जातील. ट्रेनिंगनंतर मिळणारे वेतन अंदाजे १.२० लाख रुपये असेल. ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना विवाह करता येणार नाही.
१० वर्षांच्या सर्व्हिसनंतर ज्या उमेदवारांना पर्मनंट कमिशन मिळवायचे असेल त्यांना पात्र असल्यास पर्मनंट कमिशनसाठी विचार केला जाईल. ज्यांना पर्मनंट कमिशन मिळणार नाही असे उमेदवार सर्व्हिस कालावधी वाढून मिळण्यासाठी मागणी करू शकतात. त्यानुसार सर्व्हिस २ २ वर्षांसाठी वाढविली जाऊ शकते.
शंकासमाधानासाठी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या Feedback/ Query या ऑप्शनवर संपर्क साधावा.
ऑनलाइन अर्ज www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर दि. २१ फेब्रुवारी २०२४ (१५.०० वाजे)पर्यंत करावेत. (Officer Entry Appln/Login?Registration ? Officerl s Selection Eligibility ? Apply)
सिडकोमधील संधी
सिडको ( CIDCO) महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी सिडकोमध्ये ‘सहाय्यक अभियंता (स्थापत्य)’ पदांची सरळसेवा भरती. एकूण रिक्त पदे – १०१ (अजा – १३, अज – ७, विजा-अ – ३, भज-ब – ३, भज-क – ४, भज-ड – २, विमाप्र – २, इमाव – १९, आदुघ – १०, खुला – ३८) (महिलांसाठी ३१ पदे, खेळाडूंसाठी ५ पदे, दिव्यांग ४ पदे राखीव). वेतन श्रेणी – एस-१५ (रु. ४१,८०० – १,३२,३००).
वयोमर्यादा – (दि. १८ जानेवारी २०२४ रोजी) खुला – ३८ वर्षे, मागासवर्गीय/अनाथ/माजी सैनिक/दिव्यांग/आदुघ – ४३ वर्षे, दिव्यांग – ४५ वर्षे.
पात्रता – (१) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी, (२) सॅपइआरपी (टीइआरपी – १०) प्रमाणपत्र.
उमेदवाराकडे सॅप प्रमाणपत्र नसल्यास रुजू दिनांकापासून १ वर्षाच्या आत सॅप प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे अन्यथा त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येतील. तथापि, काही उमेदवारांच्या बाबतीत सॅप प्रमाणपत्र सादर करण्याचा कालावधी परिविक्षा कालावधीच्या अंतिम दिनांकापासून ६ महिन्यांपर्यंत वाढवून देण्याची मुभा आहे.
निवड पद्धती – ऑनलाइन परीक्षा वेळ १२० मिनिटे. ((१) इंग्रजी – ३० प्रश्न, (२) सामान्य ज्ञान – ३० प्रश्न, (३) आकलन क्षमता – ३० प्रश्न, (४) व्यावसायिक ज्ञान – ११० प्रश्न, प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण २०० प्रश्न, २०० गुण). चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. लेखी परीक्षेमध्ये किमान ९० गुण प्राप्त करणारे उमेदवारच पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरतील. अंतिम निवडीकरिता २०० गुणांची ऑनलाइन परीक्षा तसेच सॅप प्रमाणपत्राचे १० गुण असे एकूण २१० पैकी गुण गृहीत धरले जातील. अंतिम निकाल www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. नियुक्त झालेल्या व्यक्तीस १ वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी लागू राहील. महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी अजा/अज वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांनी नॉन-क्रिमी लेयरमध्ये मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग रु. १,०००/- जीएसटी रु. १८०/- एकूण रु. १,१८०/-.
राखीव प्रवर्ग रु. ९००/- जीएसटी रु. १६२/- एकूण रु. १,०६२/.
ऑनलाइन अर्ज https://ibpsonline.ibps.in/cidcoaprst/ या संकेतस्थळावर दि. २० फेब्रुवारी २०२४ पर्यंत करावेत.
अधिक माहितीसाठी संपर्क करा फोन नं. ०२२-६७९१८२४९.