Ministry of External Affairs Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना सुवर्णसंधी आहे. परराष्ट्र मंत्रालयात कन्सल्टंट अर्थात सल्लागार पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. उच्चशिक्षित व अनुभवी उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबाबत परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं असून, त्यात पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, नियुक्ती झाल्यानंतर देण्यात येणारं वेतन आदींबाबत सविस्तर तपशील देण्यात आला आहे. चला सविस्तर जाणून घेऊयात.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील जवळ आलीये. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ फेब्रुवारी आहे.इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. यामुळेच उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करावा.

Electricity Contract Workers, maharashtra, Promised Age Relaxation, Permanent Jobs, Yet to Be Fulfilled, nagpur, electricity workers, marathi news, devendra fadnavis,
कंत्राटी वीज कामगारांना वयात सवलतीचे आश्वासन ठरले ‘जुमला’ !
mining projects in sindhudurg
सिंधुदुर्गातील खनिज प्रकल्प कायमचे बंद व्हावेत; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पर्यावरणवाद्यांना अपेक्षा
Sarees given on ration by the women of Jawhar returned to the government
साडय़ा नको, शाश्वत रोजगार द्या! जव्हारच्या महिलांकडून रेशनवर दिलेल्या साडय़ा शासनाला परत
youth from pune who worked in merchant navy missing
मर्चंट नेव्हीत काम करणारा पुण्यातील तरूण बेपत्ता… झाले काय?

परराष्ट्र मंत्रालयात अर्ज करण्यासाठी पात्रता :

अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पुरातत्व किंवा संवर्धन किंवा संग्रहालयात पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर, पदव्युत्तर डिप्लोमा किंवा त्याहून अधिक सिव्हिल/ स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग/ आर्किटेक्चरमधील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराकडे वारसा विकास प्रकल्प जसे उत्खनन, पुनर्स्थापन आणि संरक्षण, संग्रहालय विज्ञानच्या संबंधित कार्य, आइकनोग्राफी सर्वेक्षणमध्ये १० वर्षांचा अनुभव असायला हवा. तुम्ही केलेल्या कामाचे पुरावे डिजाइनिंग, डीटीपी, सोशल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव असायला हवा.

वेतन :

परराष्ट्र मंत्रालय भरती २०२४ च्या अधिकृत पत्रानुसार ज्या उमेदवारांची निवड या पदासाठी होईल अशा उमेदवारांना प्रतिवर्ष ८.४० लाख रुपये पगार दिला जाईल. जे उमेदवार पदासाठी दिलेले नियम पूर्ण करतील अशांनी अर्जाचा फॉर्म भरून संबंधित कागदपत्र दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहेत. किंवा उमेदवार aopfsec@mea.gov.in ईमेलवर देखील त्यांचा अर्ज पाठवू शकतात.

वयोमर्यादा :

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वय हे ३५ आणि जास्तीत जास्त वय हे ६० असावे.

हेही वाचा >> SBI Recruitment 2024 : सुवर्ण संधी! SBI मध्ये मॅनेजरसह विविध १३१ पदांसाठी भरती, अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख …

दरम्यान, सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची एक चांगली संधी आहे. परंतु या पदासाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाचं अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावं.