सुहास पाटील
अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई (Maha DES)यांच्या आस्थापनेवरील पुढील रिक्त पदांची भरती.
(१) अन्वेषक गट-क – (वेतन श्रेणी – एस-८ – २५,५०० – ८१,१००, अंदाजे वेतन दरमहा रु. ४५,०००/-). एकूण १२७ पदे (अजा – १५, अज – ८, विजा-अ – ४, भज-ब – ३, भज-क – ५, भज-ड – ३, विमाप्र – ३, इमाव – २५, आदुघ – १३, खुला – ४८) (५ पदे दिव्यांग B/ LV- २, D/ HH – १ DA/ BA/ CP/ LD- १, A & D/ MI -१ साठी राखीव). पात्रता : १० वी उत्तीर्ण.
(२) सांख्यिकी सहायक गट-क – (वेतन श्रेणी – एस-१० – २९,२०० – ९२,३००, अंदाजे वेतन दरमहा रु. ५०,०००/-). एकूण ९४ पदे (अजा – १३, अज – ६, विजा-अ – १, भज-ब – ३, भज-क – ३, भज-ड – २, विमाप्र – १, इमाव – १६, आदुघ – ९, खुला – ४०) (४ पदे दिव्यांग B/ LV- १, D/ HH- १, OA/ OL/ BA/ CP/ LC/ DW- १, ASD/ SLD/ MI- १ साठी राखीव). पात्रता : गणित/ अर्थशास्त्र/ वाणिज्य/ सांख्यिकी/ इकॉनोमेट्रिक्स विषयातील द्वितीय श्रेणी किंवा ४५ टक्के गुणांसह पदवी किंवा गणित/ अर्थशास्त्र/ वाणिज्य/ सांख्यिकी/ इकॉनोमेट्रिक्स विषयातील पदव्युत्तर पदवी.
(३) सांख्यिकी सहायक गट-क – (वेतन श्रेणी – एस्-१० – २९,२०० – ९२,३००, अंदाजे वेतन दरमहा रु. ५०,०००/-). एकूण ९४ पदे (अजा – १३, अज – ६, विजा-अ – १, भज-ब – ३, भज-क – ३, भज-ड – २, विमाप्र – १, इमाव – १६, आदुघ – ९, खुला – ४०) (४ पदे दिव्यांग B/ LV- १, D/ HH- १, OA/ OL/ BA/ CP/ LC/ DW- १, ASD/ SLD/ MI- १ साठी राखीव). पात्रता : गणित/ अर्थशास्त्र/ वाणिज्य/ सांख्यिकी/ इकॉनोमेट्रिक्स विषयातील द्वितीय श्रेणी किंवा ४५ टक्के गुणांसह पदवी किंवा गणित/ अर्थशास्त्र/ वाणिज्य/ सांख्यिकी/ इकॉनोमेट्रिक्स विषयातील पदव्युत्तर पदवी.
(४) सहायक संशोधन अधिकारी गट-ब (अराजपत्रित) – (वेतन श्रेणी – एस-१४ – ३८,६०० – १,२२,८००, अंदाजे वेतन दरमहा रु. ६८,०००/-). एकूण ३९ पदे (अजा – ५, अज – ५, विजा-अ – १, भज-क – २, भज-ड – १, इमाव – ७, आदुघ – ४, खुला – १४) (२ पदे दिव्यांग B/ LV- १, ASD( M) MI/ MD- १ साठी राखीव). पात्रता : किमान द्वितीय श्रेणी किंवा ४५ टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि भारतीय सांख्यिकीय संस्था (आय.एस.आय.) किंवा भारतीय कृषी संशोधन परिषद (आय.सी.आय.) किंवा भारतीय कृषी संशोधन परिषद (आय.सी.ए.आर.) किंवा शासनमान्य संस्था यातील जिच्या प्रवेशासाठी किमान अर्हता पदवी आहे अशी संख्याशास्त्रातील पदव्युत्तर पदविका.
किंवा सांख्यिकी/ बायोमेट्री/ गणित/ अर्थशास्त्र/ इकॉनोमेट्रिक्स/ गणिती/ अर्थशास्त्र/ वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदवी.
उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी (डोमिसाईल) असावा. त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
सर्व पदांसाठी संगणक हाताळणे/ वापराबाबतचे प्रमाणपत्र नियुक्ती दिनांकापासून २ वर्षांच्या आत प्राप्त करणे आवश्यक.
विहीत नमुन्यातील लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक. अविवाहित उमेदवारांनीसुद्धा प्रतिज्ञापत्रात अविवाहित असल्याचे नमूद करून प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य.
वयोमर्यादा : दि. १ जुलै २०२३ रोजी किमान १८ वर्षे पूर्ण. (दि. १ जुलै २००५ वा त्यानंतरचा जन्म झालेला नसावा.)
कमाल वयोमर्यादा – खुला प्रवर्ग – ४० वर्षे, मागासप्रवर्ग – ४५ वर्षे.
एकूण रिक्त पदांच्या ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव. खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरिता नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आली आहे. तथापि, अजा/अज वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
निवड पद्धती : ऑनलाइन परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रत्येकी ५० गुणांचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. ऑनलाईन परीक्षा २०० गुणांची राहील. अन्वेषक गट-क पदाकरिता परीक्षेचा दर्जा १० वी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. पद क्र. २ व ३ साठी परीक्षेचा दर्जा पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान असेल. परीक्षेची वेळ, परीक्षेचा कालावधी, परीक्षा केंद्राचा पत्ता याबाबतचा तपशिल प्रवेशपत्रासोबत उपलब्ध करून देण्यात येईल. उमेदवाराने परीक्षेचे प्रवेशपत्र सर्व पदांसाठी फक्त ऑनलाइन परीक्षेच्या आधारे गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. पात्रतेसाठी ऑनलाइन परीक्षेत किमान ४५ टक्के गुण मिळविणे आवश्यक.
http:// mahades. maharashtra. gov. inया संकेतस्थळावरून आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड/जन्मदिनांक हा तपशील भरून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावयाचे आहे. प्रवेशपत्रावर उमेदवाराने त्याचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र (अर्जासोबत अपलोड केलेलेच) चिकटवावे. सदर छायाचित्रावर राजपत्रित अधिकाऱ्याचे साक्षांकन करून परीक्षेस आणणे आवश्यक.
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग रु. १,०००/-; मागासवर्गीय प्रवर्ग – रु. ९००/-. माजी सैनिकांना परीक्षा शुल्क माफ आहे.
ऑनलाइन अर्जासोबत छायाचित्र, स्वाक्षरी, डाव्या अंगठय़ाचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्र अपलोड करणे अनिवार्य.
उमेदवारांनी जाहिरातीमधील अर्ज भरण्याच्या मार्गदर्शक सूचना पॅरा ११, १२, १५ व १६ नीट वाचून समजून घेवून मगच अर्ज करावा.
ऑनलाइन अर्ज http:// mahades. maharashtra. gov. in या संकेतस्थळावर दि. ५ ऑगस्ट २०२३ पर्यंत करावेत.