Indian Navy SSC Officer Recruitment 2023: भारतीय नौदलात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशनकडून अधिकारी पदांसाठीची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २०ऑगस्ट २०२३ ही आहे. भारतीय नौदल SSC अधिकारी भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, एकूण रिक्त पदे आणि अर्ज फी या बाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
भारतीय नौदल SSC अधिकारी भरती २०२३ –
पदाचे नाव – शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर SSC- एक्झिक्युटिव (IT).
एकूण रिक्त पदे – ३५
शैक्षणिक पात्रता –
६० % गुणांसह M.Sc/ B.E/ B.Tech/ M.Tech कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/ IT/ सॉफ्टवेअर सिस्टम्स/ सायबर सिक्युरिटी/ सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन आणि नेटवर्किंग/ कॉम्प्युटर सिस्टम्स आणि नेटवर्किंग/ डेटा ॲनालिटिक्स/ आर्टिफिशियल इंटेलिजन्स) विषयात किंवा MCA + BCA/ B.Sc (कॉम्प्युटर सायन्स + IT)
अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/
हेही वाचा- ITI पास ते पदवीधरांना नोकरीची मोठी संधी! HAL मध्ये ६४७ जागांसाठी भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर
वयोमर्यादा –
उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९९ ते १ जुलै २००४ दरम्यानचा असावा.
अर्ज फी – अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून कोणतीही फी घेतली जाणार नाही.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ४ ऑगस्ट २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० ऑगस्ट २०२३
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1XwhSdsp8mbA7ZuJO-rE_Cp7sD4OpMSna/view?usp=sharing) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.