ESIS Thane Bharti 2023: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी रुग्णालय ठाणे येथे विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण २२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता या बाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

ESIS रुग्णालय ठाणे भरती २०२३ –

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, गट अ.

एकूण पदसंख्या – २२

शैक्षणिक पात्रता – M.B.B.S

नोकरी ठिकाण – ठाणे

वयोमर्यादा – 69 वर्षे

अर्जाची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन

हेही वाचा- १२ वी पास उमेदवारांना मुंबईत नोकरीची संधी! BMC लोकमान्य टिळक रुग्णालयांतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरु, महिना २५ हजार पगार मिळणार

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, रा.का.वि.यो. रुग्णालय ठाणे. दुसरा मजला, वागळे इस्टेट, ठाणे – ४००६०४

ई-मेल पत्ता – amoesisthanc@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ ऑक्टोबर २०२३

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

मुलाखतीची तारीख – ३० आणि ३१ ऑक्टोबर २०२३

मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, MH-ESI सोसायटी, दुसरा मजला, ESI सोसायटी हॉस्पिटल, वागळे इस्टेट ठाणे ४००६०४

अधिकृत वेबसाईट – http://www.esic.nic.in

भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • वैध MCI/राज्य वैद्यकीय परिषद नोंदणी प्रमाणपत्र.
  • वयाच्या पुराव्यासाठी मॅट्रिकचे प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला.
  • शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे/प्रमाणपत्रे.
  • जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्रासह
  • अनुभव प्रमाणपत्र (उपलब्ध असल्यास) / प्राधान्य
  • पॅन कार्ड, आधार कार्ड झेरॉक्सची प्रत
  • दोन फोटो.

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1DsQcj_KkkE4JmjNQ_sOVjrmgxo3IoOJX/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.