इंडियन आर्मी, इंडियन मिलिटरी ॲकॅडमी (IMA), डेहराडून येथे जुलै, २०२६ पासून सुरू होणाऱया इंडियन आर्मीमध्ये परमनंट कमिशन मिळवून देणाऱया ‘१४३ वा टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC)’ साठी इंजिनीअरिंग पदवीधर अविवाहीत पुरुष उमेदवारांना प्रवेश. इंजिनीअरिंग स्ट्रीमनुसार एकुण ३० रिक्त पदांचा तपशिल –
(१)सिव्हील इंजिनीअरिंग/बिल्डींग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी – ८ पदे.
(२)कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग/कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी/एम्.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स)/इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी/डेटा सायन्स अँड इंजिनीअरिंग इ. ६ पदे.
(३)इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स (पॉवर सिस्टीम)/इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनीअरिंग – २ पदे.
(४)इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/फायबर ऑप्टिक्स/टेली कम्युनिकेशन इ. ६ पदे.
(५) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/एअरोनॉटिकल/एरोस्पेस/एव्हिऑनिक्स/प्रोडक्शन/इंडस्ट्रियल/इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग/इंडस्ट्रीयल इंजिनीअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट/वर्कशॉप टेक्नॉलॉजी इ. – ६ पदे.
(६) Misc. Engg. Stream/kesÀefcekeÀue इंजिनीअरिंग/फूड टेक्नॉलॉजी/अॅग्रिकल्चर इंजिनीअरिंग/बायोटेक इ. – २ पदे.
पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी किंवा समतूल्य पदवी उत्तीर्ण. इंजिनीअरिंग स्ट्रीमनुसार मान्यताप्राप्त समतूल्य पात्रता पदवी यांची यादी http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये para ३ vacancies मध्ये दिलेली आहे. (अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. अंतिम निकाल दि. १ जुलै २०२६ पर्यंत सादर करणे आवश्यक.) (कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग आणि आय्टी स्ट्रीममधील पदांसाठी एम्.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) उमेदवारसुद्धा पात्र आहेत.)
वयोमर्यादा – (दि. १ जुलै २०२६ रोजी) २० ते २७ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. २ जुलै १९९९ ते ३० जून २००६ दरम्यानचा असावा.)
उंची – किमान १५७.५ सें.मी. वजन – उंची व वय यांच्या प्रमाणात.
ट्रेनिंग – निवडलेल्या उमेदवारांना प्रोबेशनवर लेफ्टनंट रँकवर शॉर्ट सर्व्हिस कमिशन दिले जाईल. १२ महिन्यांचे ट्रेनिंग इंडियन मिलिटरी अॅकॅडमी, डेहराडून येथे दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण करणाऱया कॅडेट्सना लेफ्टनंट पदावर परमनंट कमिशन दिले जाईल. ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना विवाह करण्यास मनाई आहे.
वेतन – डिफेन्स पे-मॅट्रिक्स लेव्हल-१०वर मूळ पगार रु. ५६,१००/- अधिक एम्एस्पी रु. १५,५००/- व इतर भत्ते. जेटलमेंट कॅडेट्सचा १ कोटीचा ऑर्मी ग्रुप इंशुरन्स उतरवला जाईल.
स्टायपेंड – ट्रेनिंग दरम्यान कॅडेट्सना दरमहा रु. ५६,१००/- स्टायपेंड दिले जाईल. ट्रेनिंग दरम्यान कॅडेट्स पूर्ण वेतन व इतर भत्ते मिळण्यास पात्र आहेत. परंतु ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावरच पूर्ण वेतन व इतर भत्ते दिले जातील. जेंटलमन कॅडेट्सचा रु. १.२५ कोटीचा विमा उतरविला जाईल.
निवड पद्धती – पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार एस्एस्बी इंटरव्ह्यूसाठी शॉर्टलिस्ट केले जातील. इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर आणि M.Sc. पात्रताधारक उमेदवारांचे अंतिम वर्षापर्यंतचे सरासरी गुण पाहून प्रत्येक स्ट्रीमसाठी कट ऑफ परसेंटेज ठरविले जातील. शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना प्रयागराज (यू.पी.), भोपाळ, बंगलोर, जालंधर यापैकी एक सिलेक्शन सेंटरचे वाटप केले जाईल. त्यांना तसे ई-मेलवरून व एस्एम्एस्द्वारा सूचित केले जाईल. सिलेक्शन सेंटरचे वाटप झाल्यानंतर उमेदवारांनी वेबसाईटवर लॉगइन करून SSB साठीची तारीख प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य या नियमाने निवडता येईल. (अंतिम वर्षाच्या उमेदवारांचे इंजिनीअरिंग पदवीच्या – सरासरी ६ व्या सेमिस्टरपर्यंतचे गुण, एम्.एस्सी.साठी सरासरी दुसऱया सेमिस्टरपर्यंतचे गुण कटऑफसाठी निश्चित केलेल्या गुणांपेक्षा कमी नसावेत.)
TGC-१४३ वा कोर्सकरिता शिफारस झालेल्या उमेदवारांना संबंधित इंजिनीअरिंग स्ट्रीममध्ये रिक्त पदे उपलब्ध न झाल्यास त्यांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) कोर्स (ऑक्टोबर, २०२६) करिता पर्याय उपलब्ध राहील. मेडिकली फिट असलेल्या उमेदवारांची अंतिम निवड SSB मधील गुणवत्तेनुसार केली जाईल.
SSB इंटरव्ह्यूचा कालावधी ५ दिवसांचा असेल. उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या २ स्टेजना सामोरे जावे लागेल. जे उमेदवार स्टेज-१ मधून उत्तीर्ण होतील, त्यांनाच स्टेज-२ साठी पाठविले जाईल. स्टेज-२ नंतर उमेदवारांना मेडिकल एक्झामिनेशनसाठी पाठविले जाईल.
पहिल्यांदा SSB इंटरह्यूकरिता येणारे उमेदवार प्रवास भत्ता मिळण्यास पात्र असतील. (रेल्वेच्या AC-III टियर चे भाडे किंवा बस भाडे)
प्रमोशन – निवडलेल्या इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्सना १ वर्ष सेवापूर्व सेवा ज्येष्ठता (Ante Date Seniority) लेफ्टनंट पदावर दिली जाईल. लेफ्टनंट पदावरील कमिशनिंगनंतर २ वर्षांनी कॅप्टन रँकवर, ६ वर्षं पूर्ण झाल्यावर मेजर, १३ वर्षं पूर्ण झाल्यावर लेफ्टनंट कर्नल २६ वर्षे पूर्ण झाल्यावर कर्नल (TS) रँकवर पदोन्नती दिली जाईल. यापुढील कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल इ. रँकवरील प्रमोशन सिलेक्शन पद्धतीने दिली जातात.
शंकासमाधानासाठी प्रथम वेबसाईटवरील फ्रीक्वेंटली आस्क्ड् क्वेश्चन्स (FAQ) आणि इतर सूचना वाचून ह्याच्यात घ्याव्यात. वेबसाईटवरील Feedback/Query मधूनच शंकासमाधान केले जाईल.