मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजाच्या नॉन-क्रिमी लेअर गटाच्या युवक-युवतींसाठी पूर्ण वेळ, अनिवासी, निशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रवेश (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)), पुणे (नियोजन विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) व एमएसएमई टेक्नॉलॉजी सेंटर, इंडो जर्मन टूल रुम (IGTR), औरंगाबाद (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालयांतर्गत भारत सरकारची संस्था) यांचेद्वारे पुढील कोर्सेससाठी एकूण प्रवेश – ८७५.
(I) १० वी उत्तीर्ण पात्रता असलेले सर्टिफिकेट कोर्सेस (NSQF लेव्हल-३.५, ३) –
(१) ज्युनियर टेक्निशियन टूल अँड डायमेकर (कंडेन्स्ड् कोर्स इन टूल अँड डायमेकींग) कालावधी – १ महिने. प्रवेश क्षमता – ५०. (औरंगाबाद – ५)
(२) असिस्टंट ऑपरेटर CNC टर्निंग – टूल रुम (सर्टिफिकेट कोर्स इन CNC टर्निंग) – कालावधी – ५ महिने, प्रवेश क्षमता – ७५. (औरंगाबाद – २५, वाळुंज – २५, नागपूर – २५)
(३) असिस्टंट ऑपरेटर CNC मिलिंग – टूल रुम (सर्टिफिकेट कोर्स इन CNC मिलिंग) – कालावधी – ५ महिने. प्रवेश क्षमता – ७५. (औरंगाबाद – २५, वाळुंज – २५, नागपूर – २५)
(II) आय्टीआय् उत्तीर्ण (टर्नर/फिटर/मशिनिस्ट/ग्राईंडर/टूल अँड डाय मेकर) आणि फिटर/इलेक्ट्रिशियन/MMTM/MMTR/ इलेक्ट्रिकल/वायरमन पात्रता असलेले कोर्सेस (NSQF लेव्हल-४, ४.५)
(४) टेक्निशियन CNC मशिनिंग सर्टिफिकेट कोर्स इन CNC मशिनिंग – औरंगाबाद २५ (कालावधी ५ महिने).
(५) टेक्निशियन मशिन मेंटेनन्स (मेकॅट्रॉनिक्स) अॅडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन मशिन मेंटेनन्स – औरंगाबाद – ५० (कालावधी – १० महिने).
(III) डिग्री/डिप्लोमा (मेकॅनिकल/प्रोडक्शन/ऑटोमोबाईल किंवा समतूल्य इंजिनीअरिंग) पात्रता असलेले कोर्सेस (NSQF Level ४) –
(६) असिस्टंट टूल मेकर पोस्ट डिप्लोमा इन टूल अँड डाय मॅन्युफॅक्चरिंग – औरंगाबाद – ५ (कालावधी १ महिने).
(IV) डिग्री/डिप्लोमा (मेकॅनिकल/प्रोडक्शन/ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग) पात्रता असलेले कोर्सेस (NSQF Level ४.५, ४.५, ४.५) उत्तीर्ण /अंतिम परीक्षेस बसणारे –
(७) ज्युनियर डिझायनर CAD/CAM (मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन CAD/CAM) – ७५. (नागपूर – २५, पुणे – २५, कोल्हापूर – २५) (कालावधी ५ महिने).
(८) ज्युनियर डिझायनर टूल (मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन टूल डिझाईन) १२५ (औरंगाबाद – २५, कोल्हापूर – २५, नागपूर – २५, वाळुज – २५, पुणे – २५ जागा) (कालावधी ५ महिने).
(९) CNC प्रोग्रामर इन टूल रुम मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन CNC टेक्नॉलॉजी – औरंगाबाद – २५, वाळुज – २५ (कालावधी – ५ महिने).
(V) डिग्री/डिप्लोमा (मेकॅनिकल/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रूमेंटेशन किंवा समतूल्य इंजिनीअरिंग) पात्रता असलेले कोर्सेस –
(१०) असिस्टंट मेकॅट्रॉनिक्स सिस्टीम डिझायनर पोस्ट डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स – औरंगाबाद – २५ (कालावधी १० महिने) (NSQF Level ५).
(VI) डिग्री/डिप्लोमा (मेकॅनिकल/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रूमेंटेशन किंवा समतूल्य इंजिनीअरिंग) पात्रता असलेले/ परीक्षेस बसलेले –
(११) सिनियर टेक्निशियन मेकॅट्रॉनिक्स (मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन मेकॅट्रॉनिक्स) – औरंगाबाद – २५ जागा (कालावधी ५ महिने) (NSQF Level ४.५).
(१२) सिनियर टेक्निशियन मेंटेनन्स अँड ऑटोमेशन (अॅडव्हान्स डिप्लोमा इन मशिन मेंटेनन्स अँड ऑटोमेशन) – औरंगाबाद – २५ (कालावधी ५ महिने) (NSQF Level ४.५).
(VI) डिग्री (मेकॅनिकल/प्रोडक्शन/ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग) पात्रता असलेले कोर्स (अंतिम परीक्षेस बसणारे उमेदवारसुद्धा पात्र आहेत.) –
(१३) टेक्निकल सुपरवायझर कॉम्प्युटर एडेड इंजिनीअरिंग (मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर एडेड टूल इंजिनीअरिंग) – (NSQF Level-५) – १०० (नागपूर, २५, पुणे – २५, कोल्हापूर – २५, वाळुंज – २५) (कालावधी – ५ महिने).
(VII) डिग्री (मेकॅनिकल/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनीअरिंग) उत्तीर्ण –
(१४) प्रोसेस डिझायनर ऑटोमेशन (मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन ऑटोमेशन अँड प्रोसेस कंट्रोल) (NSQF Level ५.५) – औरंगाबाद – २५ (कालावधी – ५ महिने).
(VIII) डिग्री/डिप्लोमा सिव्हील इंजिनीअरिंग किंवा तत्सम पात्रता असलेले कोर्स –
(१५) फ्रंट लाईन ज्युनियर सुपरवायझर कन्स्ट्रक्शन ॲडव्हान्स डिप्लोमा इन स्ट्रक्चरल डिझाईन अँड ॲनालिसिस – प्रवेश क्षमता – १०० (औरंगाबाद – २५, कोल्हापूर – २५, पुणे – २५, नागपूर – २५) (कालावधी ५ महिने) (NSQF Level ५).
अ.क्र. ७ ते ९, ११ ते १२ वरील कोर्सेससाठी संबंधित डिग्री/डिप्लोमाच्या अंतिम परीक्षेस बसणारे उमेदवारसुद्धा पात्र आहेत. तसेच अ.क्र. १३ वरील कोर्ससाठी संबंधित डिग्री अंतिम परीक्षेस बसलेले उमेदवारसुद्धा पात्र आहेत.
ज्या उमेदवारांना आयजीटीआर. औरंगाबाद, पुणे, नागपूर, कोल्हापूर व वाळुज यापैकी जिथे प्रशिक्षण घ्यायचे आहे, त्यांनी त्याच सेंटरच्या खाली दिलेल्या QR Code किंवा संस्थेच्या http://www.igtr-aur.org या संकेतस्थळावर दि. १ जून २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत. प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख १० जून २०२५.