Indian Navy Recruitment 2023 : सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी आता सुवर्ध संधी आहे. भारतीय नौदलातील २०२३ च्या बंपर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भारतीय नौदलाकडून ऑनलाईन अॅप्लिकेशन्ससाठी मोठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार भारतीय नौदलाच्या http://www.joinindiannavy.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करु शकतात. ट्रेड्समनच्या पोस्टसाठी ही भरती काढण्यात आली आहे. भारतीय नौदलातील २४४ पदांसाठी ही भरती काढण्यात आली आहे. शेवटच्या तारखेआधी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. भारतीय नौदलाच्या २०२३ च्या भरतीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी website http://www.MahaBharti.in.या वेबसाईट्सला भेट द्या.
भारतीय नौदल भरती २०२३
विभागाचे नाव: इंडियन नेवी डिपार्टमेंट
रिक्रूटमेंट डिटेल्स : भारतीय नौदल भरती २०२३
कोणत्या पदासाठी भरती : ट्रेड्समन
किती पदांसाठी भरती : २४८
अर्ज कसा कराल : ऑनलाईन
ऑफिशियल वेबसाईट : http://www.joinindiannavy.gov.in
शैक्षणिक पात्रता : Indian Navy Application 2023
नक्की वाचा – ग्रॅज्युएशननंतर पुढे काय? हे कोर्स करा अन् कमवा बक्कळ पैसा, करिअरही होणार सेट
ट्रेड्समन (A) स्किल्डसाठी (अम्यूनिशन मेकॅनिक)
अधिकृत बोर्डाकडून मान्यताप्राप्त मॅट्रिक सर्टिफिकेट
क्राफ्टमनशिप ट्रेनिंग स्किममध्ये इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे दोन वर्षाचं सर्टिफिकेट कोर्स
यापैकी कोणताही
इलेक्ट्रिशयन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रोप्लॅटर, फिटर, इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक, मशिनिष्ट, मेकॅनिक, कम्युनिकेशन इक्विपमेंट मेंटनन्स
इतर पदासांठी
अधिकृत बोर्डाचे किंवा संस्थेचे मॅट्रिकचे सर्टिफिकेसह इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे.
या पोस्टशी संबंधित अप्रेंटिसशिपची ट्रेनिंग पूर्ण झालेली असावी.
१८ ते २५ इतकी वयोमर्यादा आहे.