UPSC- MPSC Exam Syllabus In Marathi : गेल्या काही वर्षात यूपीएससी आणि एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. शिवाय २०२५ पासून एमपीएससीने परीक्षेचा पॅटर्नदेखील बदलला आहे. मात्र, या परीक्षांचा अभ्यास मराठीतून करण्यासाठी उपलब्ध असलेली साधनं अतिशय मर्यादित आहेत. या बाबींचा विचार करून ‘लोकसत्ता डॉटकॉम’ने पुढाकार घेतला असून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५ जूनपासून ‘यूपीएससी आणि एमपीएससी’ अशी एक स्वतंत्र कॅटेगरी सुरू केली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं आता विद्यार्थ्यांसाठी सोप्पं होणार आहे.

हेही वाचा – आठवी, दहावी आणि ITI पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी; नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे ‘या’ २८१ पदांसाठी भरती सुरु

‘लोकसत्ता डॉटकॉम’ने सुरू केलेल्या या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होणार आहे. त्यासाठी यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, आंतरराष्ट्रीय संबंध, इतिहास, पर्यावरण, अंतर्गत सुरक्षा, सुशासन आणि चालू घडामोडी या सर्व महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांचे लेख प्रसिद्ध होणार आहेत.

याशिवाय यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या इतरही विषयांवरही तज्ज्ञांचे लेख वेळोवेळी उपब्लध करून देण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरांचा सराव करण्यासाठी तब्बल सात हजार प्रश्नांचा संचही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे प्रश्न- उत्तरांचे संच दर शनिवार आणि रविवारी प्रसिद्ध होतील.

हेही वाचा – भारत डायनॅमिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ १०० जागांसाठी होतेय भरती, २३ जूनपर्यंत करु शकता अर्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यूपीएससी आणि एमपीएससी संदर्भातील लेख वाचण्यासाठी काय करावे?

सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी www.lokatta.com या वेबसाईटवर लॉग- इन करून करिअर कॅटेगरी अंतर्गत येणाऱ्या यूपीएससी/ एमपीएससी या कॅटेगरीवर क्लिक करावे. त्यानंतर यूपीएससी आणि एसपीएससीशी संबंधित अभ्यासक्रमासह विविध लेख तुम्हाला वाचता येतील.