Ministry of Communication Recruitment 2023: केंद्र सरकारच्या कम्युनिकेशन मंत्रालयात कन्सल्टंट (सल्लागार) पदासाठीची भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींकडून ऑफलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या भरती प्रक्रियेसंदर्भात मंत्रालयाने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या पदाचा कार्यकाळ सहा महिन्यांचा कालावधीसाठी अल्पमुदतीच्या करारावर आधारित असेल. हा करार जास्तीत जास्त सहा टर्मपर्यंत (प्रत्येकी सहा महिने) किंवा नियमित/ प्रतिनियुक्ती होईपर्यंत किंवा ६५ वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.

कम्युनिकेशन मंत्रालय भरती २०२३ –

हेही वाचा- दहावीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावे समजत नाहीये? हे आहेत १० पर्याय, मिळू शकतो चांगला पगार

पदाचे नाव – कन्सल्टंट (सल्लागार)

रिक्त जागा – ३

वयोमर्यादा – या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

पात्रता –

हेही वाचा- इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात नोकरीची मोठी संधी; ‘या’ उमेदवारांना करता येणार अर्ज, जाणून घ्या सविस्तर

सल्लागार पदासाठी इच्छुक उमेदवार SDE/JTO, टेलिकम्युनिकेशन विभाग अथवा इतर कोणत्याही केंद्र, राज्य सरकारी विभागातून किंवा बीएसएनएल, एमटीएनएल, आयटीआय, टीसीआयएल मधून समकक्ष/ उच्च पदस्थ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेला असणं आवश्यक आहे.

कम्युनिकेशन मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, सल्लागार पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कम्युनिकेशन मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवरून पदासाठीचा अर्ज डाउनलोड करून घ्यावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

डाउनलोड केलेला अर्ज संपूर्ण माहितीसह भरून तो डायरेक्टर (एचक्यू). O/o एसआर डीडीजी, एनसीसीएस, डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन, सिटी टेलिफोन एक्सचेंज, संपंगी रामा नगर, बेंगळुरू- ५६००२७ या पत्त्यावर पाठवा.

अर्जाची करण्याची मुदत –

ऑफलाइन अर्ज सबमिट करण्यासाठी १९ जून २०२३ पर्यंत मुदत आहे. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी कम्युनिकेशन मंत्रालयाच्या अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ministry of communication recruitment 2023 salary to eligibility know how to apply jap
First published on: 02-06-2023 at 10:20 IST