MBMC Recruitment 2023 : आरोग्य सेवेतील शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि एमपीडब्ल्यू (पुरष) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ४५ पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तर या पदांसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०२३ आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्जाची पद्धत आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मीरा भाईंदर महानगरपालिका भरती २०२३ –

पदाचे नाव –

वैद्यकीय अधिकारी – १५ जागा
परिचारिका – १५ जागा
एमपीडब्ल्यू – १५ जागा

एकूण रिक्त पदे – ४५ जागा

शैक्षणिक पात्रता –

  • वैद्यकीय अधिकारी – MBBS + MIC/ MMC रेजिस्ट्रेशन.
  • परिचारिका – B.Sc (नर्सिंग) / GNM + MNC रेजिस्ट्रेशन.
  • एमपीडब्ल्यू – १२ वी विज्ञान + पॅरामेडिकल बेसिक ट्रैनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.

अर्ज फी – फी नाही.

हेही वाचा- ‘या’ उमेदवारांना जलसंपदा विभागात नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ४४९७ जागांसाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या

नोकरी ठिकाण – मीरा-भाईंदर.

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज सादर करण्याची सुरवात – ३० ऑक्टोबर २०२३
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – ८ नोव्हेंबर २०२३

अधिकृत बेवसाईट – https://www.mbmc.gov.in/

अर्ज समक्ष सादर करण्याचा पत्ता –

  • सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे – ४०११०१

भरती संबंधित अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1nshAJcn2Xk-Q2tw8Zrcg-vteyp2xePQU/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.