महाराष्ट्र लोकसेवा आयोगात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयोगाने विविध पदांच्या ८२ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तर या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जून २०२३ आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाणी या बाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ –

एकूण रिक्त पदे – ८२

पदाचे नाव एकूण रिक्त पदे
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, आयुष संचालनालयातील आयुष संचालक, गट-अ
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित, गट अ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग४१
समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
२२
गृह प्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग१८

शैक्षणिक पात्रता –

हेही वाचा- सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे येथे नोकरीची संधी! लवकरच ‘या’ ३१३ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या सविस्तर

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, आयुष संचालनालयातील आयुष संचालक, गट-अ –

महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट, १९६१ मध्ये वेळोवेळी सुधारित केलेल्या वेळापत्रकाच्या भाग A, B किंवा C मध्ये नमूद केलेली पात्रता असणे आवश्यक. + १० वर्षाचा अनुभव.

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित, गट अ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग –

B.A/ B.Sc/ B.Com/ LAW + सामाजिक कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन पदव्युत्तर डिप्लोमा/ पदवी.

समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग – समाज कल्याण विज्ञान किंवा सामाजिक कार्य पदवी.

गृह प्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग – B.A/ B.Sc/ B.Com/ LAW + शिक्षण पदवी + ५ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा – प्रत्येक प्रवर्गासाठी वेगवेगळी वयोमर्यादा आहे. वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात बघा.

अर्ज शुल्क –

हेही वाचा- पोलीस कॉन्स्टेबल भरतीची तयारी करताय? मग जाणून घ्या पात्रता, वय आणि कशी असते निवड-प्रक्रिया!

खुला प्रवर्ग – ७१९ रुपये.

मागासवर्गीय/ अनाथ – ४४९ रुपये.

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा –

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ जून २०२३.

या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी https://mpsc.gov.in/adv_notification?m=8 या लिंकला अवश्य भेट द्या.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकला भेट द्या.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc bharti 2023 maharashtra public service commission has announced the recruitment for 82 posts jap
First published on: 11-05-2023 at 19:13 IST