फारूक नाईकवाडे
प्रश्नांचे नेमके स्वरूप समजून घेणे आणि त्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नप्रत्रिकांचे नियमित वाचन आणि विश्लेषण करायला हवे. प्रश्नांचे स्वरुप लक्षात आले की, नेमके काय वाचायला हवे, ते कळते. वृत्तपत्रांतील ‘बातमी’ आणि स्पर्धा परीक्षेविषयी आवश्यक ‘माहिती’ यातला फरक लक्षात यायला लागला की समजावे आपण योग्य दिशा पकडली आहे.

‘चालू घडामोडी’ या घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहीत केलेला आहे:

चालू घडामोडी झ्र जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील

अभ्यासक्रम अशा प्रकारे थोडक्यात मांडलेला असतो त्यावेळी अभ्यास नेमका काय करायचा, कशाचा करायचा हे ठरवून घेणे आवश्यक ठरते. यासाठी प्रश्नांचे नेमके स्वरूप समजून घेणे आणि त्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नप्रत्रिकांचे नियमित वाचन आणि विश्लेषण करायला हवे. प्रश्नांचे स्वरुप लक्षात आले की, नेमके काय वाचायला हवे, ते कळते. वृत्तपत्रांतील ‘बातमी’ आणि स्पर्धा परीक्षेविषयी आवश्यक ‘माहिती’ यातला फरक लक्षात यायला लागला की समजावे आपण योग्य दिशा पकडली आहे. मागील प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाच्या आधारे या घटकाची तयारी कशी करावी ते पाहू:

● जागतिक चालू घडामोडी

● यामध्ये क्रीडा, पुरस्कार, संमेलने, विज्ञान, व्यक्तीविशेष याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या बाबी येतात.

● विश्व चषक, ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा, इतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, त्यातील विक्रम, भारत / महाराष्ट्र यांची कामगिरी यांचा आढावा घ्यायला हवा.

● साहित्य क्षेत्रातील आंतरराष्टीय पुरस्कार, चर्चेतील महत्त्वाची पुस्तके व त्यांचे लेखक, चर्चेतील लेखकांबाबतच्या महत्त्वाच्या बाबी पहाव्यात.

● चित्रपट, संगीत, पत्रकारिता, प्रशासन, संशोधन, शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात. भारतातील व्यक्तींना हे पुरस्कार मिळाले असल्यास त्यांच्या बाबतची अतिरीक्त माहिती असणे आवश्यक आहे.

● महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था तसेच संघटना यांची स्थापना, उद्देश, ठळक कार्ये, ब्रीदवाक्य, त्याचा भारत सदस्य केंव्हा झाला, भारताची संघटनेतील भूमिका, संघटनेचा नवीन ठराव किंवा इतर चर्चेतील मुद्दे या आधारावर तयारी करावी.

● आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे निर्देशांक व त्यातील भारताचे स्थान, निर्देशांक / अहवाल प्रकाशित करणारी संस्था / संघटना, महत्वाच्या निर्देशांकांचे निकष, त्यातील भारताचे अद्यायावत व मागील वर्षीचे स्थान हे मुद्दे लक्षात घ्यावेत.

● भारतातील चालू घडामोडी

● शासकीय योजनांचे उद्दीष्ट, सुरू झालेले वर्ष, तरतूदी, लाभार्थ्यांचे निकष, अंमलबजावणी यंत्रणा, असल्यास अपवाद, असल्यास कालमर्यादेतील उद्दीष्टे यांचा टेबलमध्ये नोट्स काढ़ुन अभ्यास करावा. यामध्ये नव्या योजनांवर भर द्यायला हवा. मात्र मागील पाच ते सात वर्षांमधील योजनांचा समावेश केल्यास उत्तम.

● संरक्षण घटकामध्ये पारंपरिक आणि अद्यायावत असे दोन्ही मुद्दे विचारण्यात येतात. त्यामुळे भारतातील क्षेपणास्त्रे, रणगाडे, लढाऊ विमाने, पाणबुड्या, युद्धनौका, रडार व इतर यंत्रणा यांचे नाव, प्रकार, वैशिष्ट्य, वापर, असल्यास अद्यायावत चाचणीचे परीणाम, भारतात विकसित करणारी संस्था किंवा विदेशातून आयात केले असल्यास सबंधित देश व कंपनी या मुद्द्यांच्या आधारे टेबलमध्ये नोट्स काढाव्यात.

● भारताचे शेजारी देशांशी असलेले विवाद किंवा नवे संयुक्त प्रकल्प दोन्हीचाही परीपूर्ण आढावा घेणे आवश्यक आहे. तसेच इतर देशांशी भारताने संयुक्तपणे सुरू केलेले प्रकल्प, युद्धाभ्यास यांचाही आढावा घेणे आवश्य्क आहे.

● राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा, त्यातील विजेते, महाराष्ट्राची कामगिरी यांचा आढावा घ्यायला हवा.

● राष्ट्रीय स्तरावरील साहित्य, चित्रपट, संगीत, पत्रकारीता, प्रशासन, शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार तसेच पद्मा पुरस्कार, शौर्य पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात.

● चर्चेतील व्यक्ती, त्यांचे कार्यक्षेत्र, नियुक्त्या, निवड, बढती यांचा आढावा घ्यायला हवा.

● महाराष्ट्रातील चालू घडामोडी

● महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार व त्यांचे या व मागील वर्षांचे विजेते माहित असायला हवेत.

● राज्य स्तरावरील महत्त्वाची संमेलने, त्यांचे ठिकाण, अध्यक्ष असल्यास त्याबाबत्ची ठळाक घडामोड यांची माहिती असायला हवी.

● राज्य शासनाच्या नवीन आणि चर्चेत असलेल्या जुन्या योजनांची तयारी उद्दीष्ट, सुरू झालेले वर्ष, तरतूदी, लाभार्थ्यांचे निकष, अंमलबजावणी यंत्रणा, असल्यास अपवाद, असल्यास कालमर्यादेतील उद्दीष्टे या आधारावर टेबलमध्ये नोट्स काढ़ुन करावी.

● राज्य स्तरावरील राजकीय घडामोडी, महत्वाची धोरणे, महत्वाचे आणि चर्चेतील प्रकल्प, चर्चेत असलेल्या सामाजिक समस्या माहित असणे आवश्यक आहे.

● राज्य स्तरावर चर्चेतील व्यक्ती, त्यांचे कार्यक्षेत्र, नियुक्त्या, निवड, बढती यांचा आढावा घ्यायला हवा.

● सामान्य अध्ययन घटकांशी संबंधित चालू घडामोडी

● यामध्ये निवडणूका, नवीन विधेयके, धोरणे, कायदे या राज्यव्यवस्था घटकाशी संबंधित बाबी पहायला हव्यात. भारताचे द्वीपक्षीय तसेच संघट्ना सदस्य म्हणून आंतरराष्ट्रीय संबंध या घटकाचा भाग आहेत. शासकीय धोरणे व चर्चेतील महत्वाचे निर्णय यांमधील महत्वाच्या तरतूदी समजून घ्याव्यात. नवीन धोरणांशी संबंधित आधीच्या धोरणांचा आढावा घेता आल्यास उत्तम.

● पर्यावरणाशी संबंधित वन अहवाल, प्रदूषणाशी संबंधित निर्देशांक, हवामान बदलाशी संबंधित अद्यायावत घडामोडी, संमेलने व त्यातील ठराव, कवउठच्या याद्यांमध्ये समाविष्ट भारतातील प्रजाती, असल्यास हरीत न्यायाधिकरणाचे चर्चेतील निर्णय यांचा आढावा घ्यावा.

● अर्थव्यवस्था घटकाच्या चालू घडामोडींचा अभ्यास कशा प्रकारे करावा याबाबत स्वतंत्र लेखामध्ये याआधी चर्चा करण्यात आली आहे.

● खगोलशस्त्रीय शोध, वैज्ञानिक शोध, तंत्रज्ञानविषयक अद्यायावत माहिती, भारताचा सहभाग असलेले महत्वाचे आंतरराष्ट्रीय प्रकल्प यांवा आढावा घ्यावा.

● साथीचे रोग, त्यावरचे उपाय, जागतिक आरोग्य संघटनेच्या महत्वाच्या घोषणा यांचा आढावा घ्यायला हवा.

स्पर्धा परीक्षांमध्ये घटक विषय कोणताही असो, बहुतेक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर एखादी राज्य – राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटना असतेच हे समजून घ्यायला हवे. म्हणून चालू घडामोडी हा अभ्यासाचा एक भाग न मानता तो अभ्यासाचा आधार बनला पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

steelframe. india@gmail com