MMRCL Bharti 2024: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Mumbai Metro Rail Corporation Limited) अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही एकूण ९ जागांसाठी अर्ज करू शकता. जर तुम्हाला मुंबई मेट्रो रेलमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही वेळ न घालवता अर्ज करू शकता. या नऊ जागा कोणत्या पदांसाठी आहे, अर्ज कसा करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे; याशिवाय पगार, वयोमर्यादा आणि इतर सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊ या.

पदाचे नाव –

 • सहाय्यक महाव्यवस्थापक (सुरक्षा)
 • सहायक महाव्यवस्थापक (आरएस)
 • सहायक व्यवस्थापक (पीआर)
 • सहायक व्यवस्थापक (अग्निशामक)
 • उपअभियंता (सुरक्षा)
 • कनिष्ठ अभियंता -II (E&M)
 • अग्निशमन निरीक्षक
 • कनिष्ठ अभियंता – II (सिव्हिल)
 • सीनियर असिस्टंट (एचआर)

पदसंख्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडअंतर्गत ९ विविध पदांसाठी नऊ रिक्त जागा आहेत.

Diva staion Escalator Goes In Opposite Direction Suddenly Panics Commuters shocking video
दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच
Special trains will run from Panvel to Margaon and Sawantwadi
मुंबई : पनवेल ते मडगाव, सावंतवाडी विशेष रेल्वेगाड्या धावणार
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
unique wedding card Marriage Card viral on social media
अरे बापरे! लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल
Staff Selection Commission Bharti 2024
SSC Bharti 2024: कर्मचारी निवड आयोग अंतर्गत १२१ पदांची भरती! जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
IPL 2024 Playoffs Scenario for RCB
IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?
Nagpur, Nagpur District, Mild Earthquakes, Mild Earthquakes in nagpur, Nagpur mild earthquakes, Mining Explosions, mild earthquakes Mining Explosions, marathi news, mild mild earthquakes news,
नागपूर जिल्ह्यात सलग दोन दिवस भूकंपाचे धक्के, कारण काय?
Little Girl first stage performance goes viral funny video
“नवरा गेला पळून आता काय करायचं रडून?” लहान मुलीनं शाळेत सादर केलेली कविता एकदा ऐकाच; VIDEO पाहून व्हाल लोटपोट
 • सहाय्यक महाव्यवस्थापक (सुरक्षा) – १
 • सहायक महाव्यवस्थापक (आरएस) – १
 • सहायक व्यवस्थापक (पीआर) – १
 • सहायक व्यवस्थापक (अग्निशामक)- १
 • उपअभियंता (सुरक्षा) – १
 • कनिष्ठ अभियंता -II (E&M) – १
 • अग्निशमन निरीक्षक – १
 • कनिष्ठ अभियंता – II (सिव्हिल) – १
 • सीनियर असिस्टंट (एचआर) – १

हेही वाचा : IGI Aviation recruitment 2024 : कस्टमर सर्व्हिस एजंटसाठी मोठी भरती! पाहा अर्ज प्रक्रिया

शैक्षणिक पात्रता – या पदांसाठी पात्र उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. त्याविषयी जाणून घेण्यासाठी अधिसुचना वाचावी.

वयोमर्यादा – या पदांसाठी अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवाराची वयोमर्यादा ४० वर्षे आहेत.

नोकरी ठिकाण – नोकरीचे ठिकाण मुंबई येथे आहे.

अर्ज पद्धती – तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२४ आहे.

अधिकृत वेबसाईट – अधिक सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी http://www.mmrcl.com या अधिकृत साइटवर क्लिक करावे.

अधिसुचना – अर्ज करण्यापूर्वी https://mmrcl.com/sites/default/files/Revised%20Recruitment%20Advertisement%202024%20-01.pdf या पीडिएफ लिंकवर क्लिक करून अधिसुचना नीट वाचावी.

वेतनश्रेणी – विविध पदांनुसार वेतनश्रेणी ठरवण्यात आली आहे

 • सहाय्यक महाव्यवस्थापक (सुरक्षा) – ७०,००० – २,००,००० रुपये/-
 • सहायक महाव्यवस्थापक (आरएस) – ७०,००० – २,००,००० रुपये/-
 • सहायक व्यवस्थापक (पीआर) – ५०,०००- १,६०,००० रुपये/-
 • सहायक व्यवस्थापक (अग्निशामक) – ५०,०००- १,६०,००० रुपये/-
 • उपअभियंता (सुरक्षा) – ५०,०००- १,६०,००० रुपये/-
 • कनिष्ठ अभियंता -II (E&M) – ३५,२८० ते ६७,९२० रुपये/-
 • अग्निशमन निरीक्षक – ३५,२८० ते ६७,९२० रुपये/-
 • कनिष्ठ अभियंता – II (सिव्हिल) – ३५,२८० ते ६७,९२० रुपये/-
 • सीनियर असिस्टंट (एचआर) – ३४,०२० ते ६४,३१० रुपये/-

अर्ज कसा करावा?

 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी अधिसुचना नीट वाचून घ्या.
 • नीट माहिती भरा.
 • अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी भरा.