Currency Note Press, Nashik recruitment 2024 : नाशिकमधील करन्सी नोट प्रेसमध्ये सध्या चिकित्सा अधिकारी [Medical Officer] या रिक्त पदावर भरती होत आहे. एकूण किती जागांवर भरती होणार आहे, तसेच या पदासाठी पात्रता निकष काय असतील हे जाणून घ्या. चिकित्सा अधिकारी या पदावर नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने अर्जाची अंतिम तारीख पाहा.

Currency Note Press, Nashik recruitment 2024 : रिक्त पदे आणि पदसंख्या

चिकित्सा अधिकारी या पदासाठी एकूण तीन जागांवर भरती करण्यात येणार आहे.

TMC Recruitment 2024
TMC Recruitment 2024 : मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती
Maharashtra Board HSC 12th Result Marksheet Download in Marathi
Maharashtra 12th Marksheet Download: बारावीचा निकाल जाहीर; विद्यार्थ्यांनो मार्कशीट कशी डाऊनलोड कराल जाणून घ्या
Democracy Discount
मतदानानंतर बोटावरील शाई दाखवा अन् जेवणावर मोठी सूट मिळवा; मुंबईतील १०० हून अधिक रेस्तराँमधील ऑफर
Accident recorded in Instagram Live Five boys coming to Mumbai in a car
इन्स्टाग्राम Live मध्ये रेकॉर्ड झाला अपघात; कारमधून मुंबईकडे येणाऱ्या पाच तरुणांची हुल्लडबाजी नडली, VIDEO पाहून उडेल थरकाप
career
शिक्षणाची संधी: आयआयटी, मद्रासमधील ऑनलाइन कोर्सेस
pune tata advance systems limited jobs
टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या वॉक-इन इंटरव्ह्यूचे वेळापत्रक…
Counselling Be a smart parent
समुपदेशन : स्मार्ट पालकत्व करा
SCI Mumbai Bharti 2024 Job Opportunity In Mumbai
Mumbai Job: शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये भरती, मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

Currency Note Press Nashik recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

चिकित्सा अधिकारी या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून एम.बी.बी.एस. क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे.

Currency Note Press, Nashik recruitment 2024 : वेतन

चिकित्सा अधिकारी या पदावर उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्या उमेदवारास ५५,०००/- रुपये ते ७५,००० रुपये इतके वेतन दिले जाईल.

हेही वाचा : PCMC Shikshak recruitment 2024 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेंतर्गत ‘३२७’ जागांवर नोकरीची संधी!

Currency Note Press Nashik recruitment 2024 – करन्सी नोट प्रेस – नाशिक अधिकृत वेबसाईट –
https://cnpnashik.spmcil.com/en

Currency Note Press Nashik recruitment 2024 – अधिसूचना –
https://cnpnashik.spmcil.com/wp-content/uploads/2024/03/Advt.-No.-for-Medical-Officer.pdf

Currency Note Press Nashik recruitment 2024 : अर्ज प्रक्रिया

चिकित्सा अधिकारी या पदावर नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी, ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
तसेच अर्ज हा मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे. म्हणजेच अर्ज हा वॉक इन इंटरव्ह्यूदरम्यान भरायचा आहे.
त्यामुळे इच्छुक उमेदवाराने अर्ज भरण्याआधी नोकरीसंदर्भातील अधिसूचना व्यवस्थित वाचावी.
वॉक इन इंटरव्ह्यूसाठी जाताना उमेदवाराने सर्व आवश्यक ती कागदपत्रे अर्जासह जोडणे अनिवार्य आहे.
तसेच मुलाखतीला जाताना स्वतःचे ओळखपत्र सोबत ठेवावे.
अर्ज – मुलाखतीची अंतिम तारीख ही २३ मार्च २०२४ अशी आहे.

‘चिकित्सा अधिकारी’ या पदासाठी अर्ज घेऊन मुलाखतीसाठी कुठे आणि किती वाजता जायचे आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती नोकरीच्या अधिसूचनेत वाचावी. तसेच या नोकरीसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास करन्सी नोट प्रेस – नाशिकच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अधिकृत वेबसाईट तसेच नोकरीची अधिसूचना वर नमूद केलेली आहे.