NALCO Recruitment 2024 : नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड NALCO ने भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ‘पदवीधर अभियंता ट्रेनी’ (Graduate Engineers Trainee) या पदासाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. अभियांत्रिकीमध्ये पदवीधर अभियोग्यता चाचणीमध्ये म्हणजेच GATE 2023 मध्ये स्कोअर केलेले पात्र उमेदवार nalcoindia.com या अधिकृत वेबसाइटद्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया ४ मार्चपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होईल आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २ एप्रिल असेल.

NALCO Recruitment 2024 : या भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे, अर्ज शुल्क, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया यांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

रिक्त जागा आणि पदे : पदवीधर अभियंता ट्रेनी (Graduate Engineers Trainee) या पदाच्या २७७ जागा भरण्यासाठी भरती मोहीम आयोजित केली जात आहे.

यांत्रिक- १२७ पदे.
इलेक्ट्रिकल- १०० पदे.
इन्स्ट्रुमेंटेशन- २० पदे.
धातुशास्त्र- १० पदे.
रासायनिक- १३ पदे.
रसायनशास्त्र- ७ पदे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे ३० वर्षे असावे.

अर्ज शुल्क : ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये; तर विभागीय उमेदवारांसह इतर सर्व उमेदवारांसाठी १०० रुपये आहे.

निवड प्रक्रिया : उमेदवारांची अंतिम निवड GATE 2023 मध्ये मिळालेले गुण आणि वैयक्तिक मुलाखतीतील त्यांची कामगिरी यांवर आधारित असेल.

हेही वाचा…SAIL Recruitment 2024: ‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया’मध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरू; अशी होणार उमेदवारांची निवड

अधिक माहितीसाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर अधिसूचना पाहू शकतात.

लिंक : https://mudira.nalcoindia.co.in/iorms/UploadData/Advertisement/638442872175902093_RECRUITMENT%20OF%20GRADUATE%20ENGINEER%20TRAINEES%20(GETs)%20THROUGH%20GATE-2023.pdf

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर अशा प्रकारे उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.