NMMC CMYKPY Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधर आणि इयत्ता १२ वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी चालू आली आहे. कारण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेत १९४ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. शिकाऊ पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२४ आहे. मात्र अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पदभरतीसाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन अन् परीक्षा शुल्क याबद्दल जाणून घ्या….
रिक्त पदसंख्या : १९४ (NMMC CMYKPY Bharti 2024)
पदाचे नाव
शिकाऊ
शैक्षणिक पात्रता
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार १२ वी/ ITI/ उत्तीर्ण/ डिप्लोमा/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमार्यादा
नवी मुंबई महानगरपालिकेच्या भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय १८ ते कमाल ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यत आहे, याच वयोगटातील उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज शुल्क
या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
नोकरी ठिकाण
नवी मुंबई
वेतनश्रेणी
या भरतीप्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार पगार दिला जाणार आहे. म्हणजे १२ वी पास उमेदवारास दरमहा ६ हजार रुपये, आयटीआय/पदविका उमेदवारास ८ हजार रुपये आणि पदवीधर/ पदव्युत्तर उमेदवारास प्रति महिना १० हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.
Read More Career News : BCCI Recruitment 2024 : बीसीसीआयमध्ये ‘या’ रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या पगार आणि अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्याची शेवटची तारीख
२० ऑगस्ट २०२४ ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा.
शिबिराची तारीख आणि ठिकाण
नवी मुंबई महानगरपालिका(मुख्यालय) भूखंड क्र.१, सेक्टर १५ ओ, सी.बी.डी बेलापूर नवी मुंबई हे शिबिराचे ठिकाण आहे. २० ऑगस्ट २०२४ रोजी हे शिबिर आयोजित केले आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सर्व कागदपत्रांसह तिथे उपस्थित राहायचे आहे.
भरतीसंदर्भातील अधिकृत जाहिरात
https://drive.google.com
अर्ज भरण्याची लिंक
https://rojgar.mahaswayam.gov.in
अधिकृत वेबसाइट
www.nmmc.gov.in/navimumbai/
अधिकृत जाहिरात लिंक
Navi Mumbai Municipal Corporation Mukhyamantri – Yuva Karya Prashikshan Yojana