NTPC Recruitment 2023: नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड ( एनटीपीसी)द्वारे साहाय्यक रासायनिक प्रशिक्षणार्थी (Assistant Chemical Trainee)या पदासाठी भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अधिकृत वेबसाइट careers.ntpc.co.in किंवा ntpc.co.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख १ जून २०२३ निश्चित करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मोहिमेचा हेतू देशभरातून एनटीपीसी लिमिटेडमध्ये साहाय्यक रासायनिक प्रशिक्षणार्थींच्या ३० जागांची भरती करणे हा आहे. या उमेदवारांना अखिल भारतीय निवड परीक्षेसाठी उपस्थित राहावे लागेल आणि मेडिकल परीक्षा पास करावी लागेल.

NTPC Recruitment 2023: वयोमर्यादा

अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय १ जून २०२३ मध्ये २७ वर्षांपेक्षा कमी नसले पाहिजे. पण, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत शिथिलता देण्याची तरतूद केली आहे.ॉ

हेही वाचा – सॅलरी कितना लोगे भैय्या? Amazon, Infosys सारख्या कंपनीत मुलाखतीची मिळू शकते संधी, इंजिनिअरने दिल्या भन्नाट आयडिया

NTPC Recruitment 2023: शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ किंवा संस्थेतून रसायनशास्त्रात किमान ६०% गुणांसह M.Sc उत्तीर्ण केलेले असावे. विशेष म्हणजे अंतिम वर्ष किंवा अंतिम सत्रातील ज्या विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत निकाल अपेक्षित आहे, तेही या पदासाठी अर्ज करू शकतात.

NTPC Recruitment 2023: किती मिळेल पगार

निवडलेल्या उमेदवारांना ३०००० रुपये प्रति महिना, निवास आणि इतर भत्ते एका वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत दिले जातील. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर, निवडलेल्या उमेदवारांना रु.३०००० ते रु.१,२०,००० वेतनश्रेणी दिली जाईल.

हेही वाचा – इंडियन बँकेत ‘या’ पदांसाठी होणार भरती, मुलाखतीद्वारे होईल निवड, जाणून घ्या पात्रता निकष

NTPC Recruitment 2023:अर्ज करण्यासाठी थेट लिंक – https://careers.ntpc.co.in/recruitment/login.php
NTPC Recruitment 2023: नोटिफिकेशन पाहण्यासाठी थेट लिंक येथे आहे –
ttps://careers.ntpc.co.in/recruitment/advertisements/092023_eng_adv

NTPC Recruitment 2023: अर्ज करण्याची पद्धती

  • सर्वप्रथम careers.ntpc.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • साहाय्यक रासायनिक प्रशिक्षणार्थी (ACT) च्या भरतीसाठी येथे लिंकवर क्लिक करा.
  • पोर्टलवर नोंदणी करा आणि आवश्यक तपशील भरा.
  • पूर्ण केलेला फॉर्म सबमिट करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट काढून घ्या.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ntpc recruitment 2023 for 30 assistant chemical trainee posts check eligibility 30 thousand salrry per month snk
First published on: 25-05-2023 at 12:20 IST