Pawan Hans Recruitment 2024 : भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या पवनहंस लिमिटेडमध्ये भरती मोहीम जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठी अधिकृत वेबसाइटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. असोसिएट हेलिकॉप्टर पायलट (Associate Helicopter Pilot) या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ३० एप्रिल २०२४ पूर्वी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.

Pawan Hans Recruitment 2024: या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज कसा करायचा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

रिक्त पदे आणि पदसंख्या –

पवनहंस लिमिटेड अंतर्गत असोसिएट हेलिकॉप्टर पायलट पदाच्या ५० रिक्त जागांसाठी ही भरती मोहीम राबवण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता –

या भरतीच्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता आणि संपूर्ण अधिकृत जाहिरात नीट वाचून घ्यावी. खालील लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना डाउनलोड करा:
लिंक – Pilot 2024 Download PDF

पगार –

असोसिएट हेलिकॉप्टर पायलटला कराराच्या आधारावर नियुक्ती आणि त्यांच्या हेलिकॉप्टरवरील उड्डाण अनुभवाच्या आधारे मानधन दिले जाईल. असोसिएट हेलिकॉप्टर पायलटसाठी पॅकेजची रक्कम १.५० लाख ते ४.५० लाख रुपये असणार आहे.

हेही वाचा…BOI Recruitment 2024: बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु, आजचं करा अर्ज

अर्ज कसा कराल ?

फॉर्म भरण्याची अधिकृत लिंक वेबसाइटवर उपलब्ध आहे. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही अर्ज करू शकता.

१. सर्वप्रथम http://www.pawanhans.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. होम पेजवर पवन हंस भरती २०२४ या लिंकवर क्लिक करा.
३. सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रे उपलोड करून घ्यावी.
४. अर्ज जमा (Submit) करा.
५. संदर्भासाठी या फॉर्मची एक प्रिंटआउटसुद्धा घ्या. अशाप्रकारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.