लवकरच RBI मध्ये असिस्टंट भरती, अर्ज करण्यापूर्वी परीक्षेचे पात्रता निकष आणि भरती प्रक्रिया जाणून घ्या

अनेक तरुणांना बँकिंग सेक्टरमध्ये काम करण्याची इच्छा असते.

RBI Assistant 2023 recruiting
बँक असिस्टंट पदासाठी पात्र उमेदवारांच्या RBI कडून दरवर्षी परीक्षा घेतली जाते. (Photo : Indian Express)

RBI Assistant 2023: भारतीय रिझव्‍‌र्ह बँक (RBI) असिस्टंट भरती २०२३ ची अधिसूचना लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. आरबीआय असिस्टेंट २०२३ पीडीएफ डाउनलोड करण्यासाठीची लिंक भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उपलब्ध करण्यात येणार आहे. भारतीय रिझव्‍‌र्ह बँक असिस्टंट पदासाठी पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी दरवर्षी आरबीआयकडून असिस्टंट परीक्षा घेतली जाते. या परीक्षेची अनेक उमेदवार आतुरतेने वाट पाहात असतात. कारण अनेकांना त्यांना बँकिंग सेक्टरमध्ये काम करण्याची इच्छा असते. यासाठीच आम्ही तुम्हाला RBI असिस्टंट २०२३ शी निगडीत काही महत्वाची माहिती देणार आहोत. ज्यामध्ये अभ्यासक्रम परीक्षा तारीख, पगार, पात्रता, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, इत्यादीचा समावेश आहे.

RBI सहाय्यक २०३३ अधिसूचना

आरबीआय असिस्टंट २०३३ अधिसूचना PDF मार्च २०२३ मध्ये जारी होण्याची अपेक्षा आहे. शिवाय विद्यार्थ्यांना या परीक्षे संदर्भातील सर्व माहिती विद्यार्थ्यांना असणं आवश्यक आहे. यासाठी आरबीआय असिस्टंट २०३३ नेमकी कशी असेल याबाबतची काही माहिती पुढीलप्रमाणे.

हेही वाचा- मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदांवर बंपर भरती; BMC रुग्णालयात काम करण्याची संधी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया –

परीक्षेचे नाव – RBI परीक्षा २०२२

  • पोस्ट – असिस्टंट
  • रिक्त जागा – अद्याप जाहीर केलेल्या नाहीत
  • श्रेणी – बँक नोकरी
  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही
  • भत्ता – भत्ते महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, विशेष भत्ता, वाहतूक भत्ता.
  • परीक्षेची भाषा – इंग्रजी आणि हिंदी
  • निवड प्रक्रिया – Prelims and Mains
  • अर्जाची पद्धत – ऑनलाइन

अधिकृत वेबसाइट – http://www.rbi.org.in

हेही वाचा- India Post Recruitment: १० वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, भारतीय पोस्ट विभागात ५८ पदांसाठी होणार भरती

RBI असिस्टंट २०२३ ऑनलाइन अर्ज –

RBI असिस्टंट ऑनलाइन अर्ज लिंक मार्च 2023 मध्ये सक्रिय होईल. असिस्टंट पदाच्या भरतीसाठी ऑनलाइन नोंदनी करणं आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज करण्याआधी, उमेदवारांना ते अर्ज करण्यास पात्र आहेत का नाही याची खात्री करुन घेण्यासाठी याबाबतचा सर्व तपशील काळजीपुर्वक पाहणं गरजेचं आहे. शिवाय ऑनलाइन अर्ज ते वेळेवर करणं आवश्यक आहे.

अर्ज शुल्क – (मागील वर्षाच्या अधिसुचनेनुसार)

सामान्य/ओबीसी वर्गासाठी ४५० रुपये

SC/ST/PWD/EXS श्रेणीसाठी ५० रुपये

शैक्षणिक पात्रता –

उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह पदवी किंवा समतुल्य पदवी प्राप्त केलेली असावी. SC/ST/PWD मधील उमेदवारांसाठी, एकूण उत्तीर्ण गुण आवश्यक आहेत.

वयोमर्यादा –

किमान २० वर्षे तर कमाल २८ वर्षे

शिवाय या भरतीसाठीच्या प्र्त्येक अपडेटसाठी तुम्ही बॅंकेच्या या http://www.rbi.org.in अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 10:27 IST
Next Story
कृषी वैज्ञानिक निवड मंडळामध्ये नोकरी करायची सुवर्णसंधी; ‘या’ दिवसापूर्वी करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर
Exit mobile version