SBI Clerk Notification 2025 Out: बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने ज्युनियर असोसिएट्स (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) या पदाच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे, ज्याला सामान्यतः एसबीआय क्लर्क म्हणून ओळखले जाते. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार २६ ऑगस्ट २०२५ पर्यंत अधिकृत वेबसाइट – sbi.co.in – वर अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ६,५८९ ज्युनियर असोसिएट रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घेऊयात.

पात्रता निकष

वयोमर्यादा: अर्जदारांचे वय १ एप्रिल २०२५ रोजी २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे. त्यांचा जन्म २ एप्रिल १९९७ ते १ एप्रिल २००५ (दोन्ही तारखा समाविष्ट) दरम्यान असावा. सरकारी नियमांनुसार राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी वयात सूट लागू आहे.

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य पात्रता. एकात्मिक दुहेरी पदवी असलेल्या उमेदवारांनी उत्तीर्ण होण्याची तारीख ३१ डिसेंबर २०२५ किंवा त्यापूर्वीची असल्याची खात्री करावी.

पदवीच्या अंतिम वर्ष/सेमिस्टरमध्ये असलेले विद्यार्थी तात्पुरते अर्ज करू शकतात. मात्र, निवड झाल्यास त्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल.

निवड प्रक्रिया काय आहे?

निवड तीन पातळ्यांवर होईल:

प्राथमिक परीक्षा: १०० गुणांसह वस्तुनिष्ठ चाचणी; कालावधी — १ तास.

मुख्य परीक्षा: २०० गुणांसाठी १९० प्रश्नांसह वस्तुनिष्ठ चाचणी; कालावधी — २ तास ४० मिनिटे.

स्थानिक भाषा प्रवीणता चाचणी (LLPT): ज्या उमेदवारांनी (इयत्ता १० वी किंवा १२ वी मध्ये) अर्ज केलेल्या राज्याच्या विशिष्ट स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला नाही त्यांना मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर २० गुणांच्या LLPT साठी उपस्थित राहावे लागेल.

अर्ज शुल्क

जनरल, OBC आणि EWS उमेदवारांसाठी ७५० रुपये आहे. SC, ST, PwBD, XS आणि DXS उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.

सविस्तर सूचना आणि अर्ज करण्यासाठी sbi.co.in/careers ला भेट द्या.

SBI Clerk Notification Recruitment 2025: अर्ज कसा करावा?

अधिकृत वेबसाइटला भेट द्या

भर्ती लिंकवर क्लिक करा आणि स्वतःची नोंदणी करा

अर्ज भरा

आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी भरा

फॉर्म सबमिट करा.

उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याआधी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.एकदा जमा केलेले अर्ज मागे घेण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि एकदा भरलेले शुल्क परत केले जाणार नाही. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार बँक ऑफ महाराष्ट्रची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.