SSC Delhi Police CAPF SI Recruitment 2023: एसएससी सीएपीएफ दिल्ली पोलिस सब इंस्पेक्टर भरतीसाठी २०२३ करीता अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छूक उमेदवार ssc.nic.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. सविस्तर अधिसुचना जाहीर केल्यानंतर वेबसाईटवर अर्जाची लिंक सुरू केली आहे.

अधिसुचनेनुसार, १८७६ पदांवर भरती केली जाणार आहे ज्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसमध्ये पुरषांसाठी १०९ आणि महिलासाठी ५३ पदांसाठी भरती होणार आहे तर सीएपीएपमध्ये १७१४ पदांसाठी भरती होणार आहे. उमेदवार १५ ऑगस्टच्या रात्री ११ वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. शुल्क जमा केल्यावर १६ ते १७ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेपर्यंत अर्जातील त्रुटी सुधारण्याची संधी असेल. ऑक्टोबरमध्ये संगणक आधारित परीक्षा होण्याची शक्यता आहे.

शैक्षणिक पात्रता- उमेदवाराकडे कोणत्याही विषयातील पदवी असावी.

वोयमर्यादा – या पदासाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा २५ वर्ष आहे. एससी व एसटीच्या वयोमर्यादेत अनुसूचित जाती-जमातींना वयात पाच वर्षांची आणि ओबीसींना तीन वर्षांची सूट दिली जाईल. १ जानेवारी २०२२ पासून वयाची गणना केली जाईल.

AAI मध्ये ३४२ पदांसाठी होणार भरती; पदवीधर करू शकतात अर्ज, किती मिळेल पगार? जाणून घ्या

परिक्षा आणि निवड प्रक्रिया

परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षेत ऑब्जेक्टिव मल्टीपल च्वाइस प्रश्न असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुणाचे निगेटिव्ह मार्किंग असेल.

जे प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण होतात त्यांना PET PST साठी बोलावले जाईल. म्हणजेच, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि शारीरिक मानक चाचणी (पीईटी आणि पीएसटी) चा दुसरा टप्पा असेल. धावण्याच्या या टप्प्यात फक्त उत्तीर्ण होणे, उंच उडी, लांब उडी आणि उंची मोजणे अनिवार्य आहे. म्हणजेच ते केवळ पात्रता असेल. त्याचे गुण अंतिम गुणवत्तेत जोडले जाणार नाहीत.

अधिकृत अधिसुचना – https://ssc.nic.in/SSCFileServer/PortalManagement/UploadedFiles/notice_CPO-SI-2023_22072023.pdf

धावणे आणि उडी मारण्याचे नियम
पुरुषांकरिता

  • १०० मीटरची शर्यत १६ सेकंदात
  • ६.५ मिनिटांत १.६ किमी धावणे
  • ३.६५ मीटर लांब उडी (३ संधीमध्ये)
  • १.२ मीटर उंच उडी (३ संधींमध्ये)
    शॉट पुट (१६ एलबीएस) ४.५ मीटर फेकणे. (३ संधीमध्ये)

महिलांसाठी

  • १८ सेकंदात १०० मीटरची शर्यत
  • ४ मिनिटांत ८०० मीटरची शर्यत
  • २.७ मीटर लांब उडी (३ संधीमध्ये)
  • ०.९ मीटर उंच उडी (३ संधीमध्ये)

हेही वाचा – UPSC Recruitment 2023: यूपीएससीच्या ७१ पदांवर होणार भरती, किती असेल पगार? जाणून घ्या

पीईटी – शारीरिक मोजमाप
पुरुषांकरिता
लांबी -१७० सेमी
छाती – ८० सेमी
श्वास घेऊन फुगवलेली छाती – ८५ सेमी

महिलांसाठी
लांबी – १५७ सेमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीईटी आणि पीएसटी टप्प्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना पेपर-२ मध्ये उपस्थित राहावे लागेल. पेपर-२ मध्ये इंग्रजी भाषा आणि मूल्यमापन चाचणी असेल. पेपर-१ आणि पेपर-२ मधील कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता तयार केली जाईल. पेपर-१ आणि पेपर-२ मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जाईल. वैद्यकीय पास उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.