Success Story: ज्या व्यक्तीमध्ये आपले स्वप्न साकारण्याची इच्छा असते, ती कोणत्याही वयात आपली स्वप्ने पूर्ण करू शकते. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच एका व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास घेऊन आलो आहोत, ज्यांची यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल. डॉ. एन. एस. धनम असे या व्यक्तीचे नाव असून ज्यांनी ८१ व्या वर्षी पीएचडी आणि ९१ व्या वर्षी डी. लिट पदवी मिळवली आहे.

डॉ. एस. एन. धनम यांचा जन्म १९३४ मध्ये आंध्र प्रदेशातील पिठापुरम येथे झाला. त्यांनी सरकारी कार्यालयात लिपिक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, पण त्यानंतर हळूहळू त्यांनी यशाचे अनेक टप्पे पार केले. धनम खाजगी क्षेत्रात गेले आणि विशाखापट्टणममधील कॅलटेक्समध्ये सहभागी झाले. ४० वर्षांच्या कालावधीत ते संयुक्त व्यवस्थापकीय संचालक बनले आणि दक्षिण कोरिया, ओमान, बहरीन आणि फिलीपिन्समध्ये त्यांनी काम केले.

९१ व्या वर्षी मिळवली डी.लिट पदवी

डॉ. एस. एन. धनम हे १९९४ मध्ये निवृत्त झाले. पण, त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. त्यांनी पदव्युत्तर तत्वज्ञान अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी आंध्र विद्यापीठातून पीएचडी पदवी मिळवली. तसेच काही महिन्यांपूर्वी वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी व्हिएतनाम राष्ट्रीय विद्यापीठातून डी.लिट पदवी मिळवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. धनम यांची कहाणी हे सिद्ध करते की सुरुवात करायला कधीच उशीर होत नाही. आपण नेहमी काहीतरी नवीन शिकत राहिले पाहिजे. आपण ६० वर्षांचे असो, ८१ वर्षांचे असो किंवा ९१ वर्षांचे असो. ही कहाणी आपल्याला प्रेरणा देते की शिकण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नसते.