Success Story of Arpita Thube: केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) नागरी सेवा परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार नागरी सेवेत सामील होण्याचे स्वप्न पाहतात. पण, या कठीण प्रवासात काही मोजकेच लोक यशस्वी होतात. बरेच लोक काही कारणास्तव हार मानतात. तर काहीजण त्यांच्या अढळ समर्पणाने आणि कठोर परिश्रमाने एक आदर्श निर्माण करतात. याचच एक उदाहरण म्हणजे आयएएस अधिकारी अर्पिता थुबे.

अर्पिताचे सुरुवातीचे शिक्षण

अर्पिता ही महाराष्ट्रातील ठाणे शहरातील आहे. सुरुवातीपासूनच तिचा शैक्षणिक रेकॉर्ड खूप चांगला आहे. तिने सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचे (Electrical Engineering) शिक्षण पूर्ण केले. देशाची सेवा करण्याच्या तीव्र इच्छेने तिने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

चौथ्या प्रयत्नात झाली आयएएस

अर्पिता चौथ्या प्रयत्नात आयएएस होण्यात यशस्वी झाली. अर्पिताने २०१९ मध्ये पहिल्यांदाच यूपीएससीची परीक्षा दिली. पण, ती प्रिलिम्सही उत्तीर्ण होऊ शकली नाही, जो तिच्यासाठी एक मोठा धक्का होता. त्यानंतर हार मानण्याऐवजी, तिने तो एक शिकण्याचा अनुभव म्हणून घेतला.

या रँकसह अर्पिता आयपीएस झाली

अपयशी ठरल्यानंतर, २०२० मध्ये, ती आणखी मजबूत होऊन परतली. अर्पिताच्या कठोर परिश्रमाचे चीज झाले जेव्हा तिने ३८३ वा क्रमांक मिळवला आणि ती भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) रुजू झाली. पण, तिची खरी इच्छा भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) सामील होण्याची होती.

आयपीएस झाल्यानंतर पुन्हा अपयशाचा सामना

२०२१ मध्ये अर्पिता पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षेला बसली, पण तिचे लक्ष्य चुकले. या अडचणी असूनही, तिने हिंमत गमावली नाही आणि तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करत राहिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटी पूर्ण झालं IAS व्हायचं स्वप्न

तिच्या चौथ्या आणि शेवटच्या प्रयत्नात, अर्पिताने तिच्या आयपीएस ड्युटीमधून ब्रेक घेतला. २०२२ मध्ये, तिने पूर्णपणे त्याच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले आणि शेवटी, तिच्या चिकाटीला फळ मिळाले. तिने भारतीय प्रशासनिक सेवा (IAS) मध्ये यश प्राप्त केलं आणि २१४ क्रमांक मिळवला.