Success Story In Marathi : कधी कोणती गोष्ट प्रेरणा देऊन जाईल हे आपल्याला सांगता येत नाही. कधी कोणाचा एक शब्द किंवा एखादे वाक्य, एखाद्याने दिलेली छोटीशी कल्पना तुमच्या आयुष्यात जीवनावर मोठा प्रभाव पाडू शकते आणि तुमचे जीवन क्षणात बदलू शकते. तर आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्या मित्राने केलेल्या कौतुकामुळे आपली आवड कशात आहेत याची जाणीव दुसऱ्या मित्राला झाली.

जुगल किशोर असे व्यक्तीचे नाव आहे. १९९१ मध्ये जुगल किशोर यांच्या मित्राने त्यांना केक बेक करायला सांगितले. कारण जुगल बेकिंगमध्ये एक्स्पर्ट होता. मित्राने त्यांच्या हाताने बनवलेल्या केकचे खूप कौतुक केले. त्यानंतर लगेचच जुगल किशोरने त्याच्या कुटुंबाशी चर्चा केली आणि ५०,००० रुपयांच्या गुंतवणुकीतून त्यांची बेकरी सुरु केली. आता जुगल किशोर दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त इतर दोन राज्यांमध्ये बेकरीचे पदार्थ पुरवतो. पण, शिक्षक ते बेकर हा प्रवास खूप लांब आणि अजिबात सोपा नव्हता.

जुगल किशोरने त्यांची बेकरी कशी सुरू केली?

जुगल किशोर हे गुरु गोविंद सिंग स्कूल, बैकुंठ नगर गुरुद्वारा येथे शिक्षक होते. अलीगडमधील क्वार्सी बायपास येथील आनंद विहार कॉलनीत ते राहायचे. त्याचवर्षी म्हणजे १९९१ मध्ये जुगल किशोर यांच्या मुलाचा जन्म १ झाला आणि त्यानंतर एक वर्षाने म्हणजेच १९९२ मध्ये जुगल किशोर यांनी त्यांची ‘कृष्णा बिस्किट बेकरी’ सुरू केली.

जुगल किशोर यांच्या कुटुंबाने त्यांना स्वतःची बेकरी सुरू करण्यास पाठिंबा दिला. पण, जुगल किशोर यांनी बेकारी सांभाळण्यासाठी स्वतःची नोकरी सोडली नाही. पण, स्वतःचे काम सुरू करणे आणि नोकरी करणे यात संतुलन राखणे त्यांच्यासाठी खूप कठीण जात होते. पण, त्यांनी हळूहळू दोन्ही कामांचे व्यवस्थापन केले आणि कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी आणि दुसरे त्यांच्या आवडीचे काम करण्याला चालना दिली.

त्यानंतर बरीच मेहनत केल्यानंतर, त्यांचा बेकरी व्यवसाय जसजसा वाढत गेला तसतसं त्यांनी त्यांच्या बेकरीचे पदार्थ हाथरस, बुलंदशहर, मैनपुरी, फिरोजाबाद आणि बरेली यासारख्या शेजारील प्रदेशांना विकण्यास सुरुवात केली. त्यांची उलाढाल आता ५ कोटी रुपये आहे. गेल्या काही वर्षांत त्यांची बेकरी चांगली चालली आणि २०१३ मध्ये त्यांच्या मुलाने डीएस कॉलेजमधून बीकॉम पदवी पूर्ण केल्यानंतर, त्यांनी वडिलांचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांच्या बेकरीमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

पण, २०१८ मध्ये जेव्हा कुटुंबाने अलिगडमधील तलनागरी येथे ‘रिद्धिमा फूड्स’ कारखाना उघडला तेव्हा बेकरीचा व्यवसाय अधिक वाढला. या नवीन उपक्रमामुळे जुगल किशोरची बेकरी संदर्भातील आवड आणखी वाढली. रिद्धिमा फूड्स रस्क, बिस्किटे, ब्रेड, केक इत्यादी बेकरी उत्पादने विकते.रिद्धिमा फूड्सचे व्यवस्थापकीय संचालक म्हणतात की, त्यांचा हेतू आता राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि पंजाब सारख्या शेजारील राज्यांमध्ये विस्तार करण्याचा आहे.