Success Story Of Nidumolu Lakshmi Narayan Rao : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील रहिवासी असलेल्या लक्ष्मी नारायण राव याला अमेरिकन क्लाउड सिक्युरिटी कंपनी रुब्रिककडून १.४५ कोटी रुपयांची प्लेसमेंट ऑफर मिळाली आहे. ही बीआयटी मेसराच्या इतिहासातील सर्वात जास्त प्लेसमेंट पॅकेज देणारी ऑफर ठरली आहे. याआधी, संस्थेतील विद्यार्थ्याला मिळालेले सर्वात मोठे पॅकेज प्रतिवर्ष ५२ लाख रुपये होते. रांचीतील मेसरा येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (बीआयटी) येथील विद्यार्थी निदुमोलु लक्ष्मी नारायण राव यांच्या कठोर परिश्रम, सातत्य आणि समर्पणामुळे त्यांच्या यशाचा हा मार्ग मोकळा झाला आहे.

निदुमोलु लक्ष्मी नारायण राव हा संगणक विज्ञान अभियांत्रिकी विभागात अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात त्याने प्रभावी ९ CGPA राखला. मुलाखतींमधील त्याचा उत्तम शैक्षणिक रेकॉर्ड आणि कामगिरीमुळे त्याची छाप पडू लागली. राव याने रुब्रिक येथे सहा महिन्यांची इंटर्नशिप देखील पूर्ण केली. इंटर्नशिप दरम्यानच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला कंपनीत पूर्णवेळ नोकरी मिळाली. खरं तर, त्याला मायक्रोसॉफ्टने देखील एक पद ऑफर केले होते. पण, त्याने भविष्यासाठी रुब्रिकची निवड केली आणि बंगळुरू येथील कंपनीच्या कार्यालयातून त्याचा व्यावसायिक प्रवास सुरू केला.

असे टप्पे विद्यार्थ्यांची क्षमता अधोरेखित करतात (Nidumolu Lakshmi Narayan Rao)

रुब्रिक ही अमेरिकेतील एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे; जी क्लाउड डेटा सुरक्षेतील तज्ज्ञतेसाठी ओळखली जाते. बीआयटी मेसराच्या व्यवस्थापन आणि प्लेसमेंट सेलने राव याच्या कामगिरीचा आनंद साजरा केला. त्यांनी त्याच्या समर्पणाचे कौतुक केले आणि म्हटले की, त्यांनी संस्थेचं नाव मोठं केलं आहे. त्यांच्या यशामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि संस्थेच्या प्रशिक्षण आणि प्लेसमेंट कार्यक्रमांची प्रतिष्ठा वाढेल अशी अपेक्षा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीआयटी मेसरा येथील प्लेसमेंट ऑफिसरने नमूद केले की, योग्य पाठिंबा आणि संसाधने दिल्यास असे टप्पे विद्यार्थ्यांची क्षमता अधोरेखित करतात. रावची गोष्ट तुम्हाला आठवण करून देतो की, परिश्रम, अनुभव आणि लक्ष केंद्रित केल्याने संधींचे दरवाजे उघडू शकतात. विशाखापट्टणम ते १.४५ कोटी रुपयांच्या ऑफरपर्यंतचा त्यांचा प्रवास भारतातील तरुण विद्यार्थ्यांसाठी खरोखरच प्रेरणा देणारा आहे.