Success Story Of Parth Laturia In Marathi : आयटी (IIT) मध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई (JEE) परीक्षा देणं महत्त्वाचे असते. त्यामुळे जेईई परीक्षा ही भारतातील आणि जागतिक स्तरावरील सर्वात आव्हानात्मक परीक्षांपैकी एक असते. आयटी (IIT) मध्ये जागा मिळवण्याच्या आशेने भारतभरातील हजारो विद्यार्थी दरवर्षी आयआयटी-जेईई परीक्षेला बसतात. पण, या परीक्षेच्या तयारीमध्ये प्रचंड मेहनत लागते, त्यामुळे काही मोजकेच विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण करू शकतात. तर आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल (Success Story)जाणून घेणार आहोत, ज्यानी जेईई परीक्षा उत्तीर्ण केली आणि उल्लेखनीय रँक मिळवली आहे.

या हुशार व्यक्तीचे नाव आहे पार्थ लतूरिया. नांदेडमधील ज्ञानमाता विद्याविहार येथे, पार्थने २०१६ मध्ये त्याचे १० वीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने १२ वीचे शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोटाच्या दिशा डेल्फी पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घेतला, जिथे त्याला ९५.२ टक्के मार्क्स मिळाले. पार्थला ३६० पैकी ३५० गुण मिळाले. त्याला गणितात १२० पैकी १२० गुण, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रात प्रत्येकी ११५ गुण मिळाले.जेईई उत्तीर्ण झाल्यानंतर पार्थने आयआयटी बॉम्बेमध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक करण्यासाठी प्रवेश (Success Story) घेतला.

Entrance Exam JEE Mains Exam for Engineering Architecture career news
प्रवेशाची पायरी: इंजिनीअरिंग, आर्किटेक्चरसाठी जेईई मेन्स परीक्षा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
FTII student short film, FTII student short film Oscar,
‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्याचा लघुपट ऑस्करच्या स्पर्धेत
government job opportunity MPSC conducted Various exams
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल दोन हजार पदांसाठी अर्ज करण्यास काहीच दिवस शिल्लक
Success Story Of Nitin Shakya In Marathi
Success Story Of Nitin Shakya : डॉक्टर ते आयएएस अधिकारी, झोपडपट्टीतील मुलांची सेवा करताना मनात जागं झालं स्वप्न; जाणून घ्या नितीन शाक्य यांची गोष्ट
Deepinder Goyal Success Story
Success Story : सामान्य कुटुंबात जन्म, सहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण; पण, तरुणपणी मेहनतीने उभी केली तब्बल करोडोंची कंपनी
Started the business of selling organic eggs
Success Story : मेहनत व जिद्दीच्या जोरावर सुरू केला सेंद्रिय अंडी विकण्याचा व्यवसाय; आज वर्षाला करतात करोडोंची कमाई
Indian economy current affairs
MPSC मंत्र: राज्य सेवा मुख्य परीक्षा; अर्थव्यवस्था चालू घडामोडी

पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यानी अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून आर्थिक गणितात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पार्थ त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या शिक्षकांच्या निरंतर मार्गदर्शनाला देतो, ज्यामुळे त्याची वैचारिक समज सुधारली. कोचिंगच्या धड्यांव्यतिरिक्त त्यानी दररोज पाच ते सहा तास स्वतंत्र अभ्यासासाठीसुद्धा दिले होते. पार्थचे आई-वडील सतीश, सीमा लतूरिया दोघेही डॉक्टर आहेत. त्याची आई बालरोगतज्ज्ञ, तर वडील सामान्य वैद्यकीयतज्ज्ञ आहेत. त्यांनी पार्थला त्याच्या मोहिमेत खूप आधार दिला.

हेही वाचा…Success Story : मार्केटमधून मॅगी गायब, एका स्ट्रॅटजीने पुन्हा जोडले ग्राहक; वाचा २६ वर्षांचा सुरेश नारायणन यांचा प्रवास

आयआयटी बॉम्बे ते मॉर्गन स्टॅनली…

पार्थने आयआयटी बॉम्बे येथे इंटर्नशिप पूर्ण केली. नंतर रिसर्च इंटर्न म्हणून इंडियाना युनिव्हर्सिटी ब्लूमिंग्टनमध्ये काम करण्यासाठी जाण्यापूर्वी त्यानी बँक ऑफ बडोदा येथे डेटा सायन्समध्ये प्रथम प्रवेश केला. पदवी घेतल्यानंतर त्यानी मॉर्गन स्टॅन्लेच्या मुदत उत्पन्न ठेव विभागात सहयोगी म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि सध्या तो तेथे वरिष्ठ सहयोगी आहे.

त्यानी लिंक्डइनवर सांगितले की, ‘नांदेड ते कोटा, आयआयटी बॉम्बे ते मॉर्गन स्टॅनली आणि आता, प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या मास्टर्स इन फायनान्स प्रोग्रामसाठी माझी निवड झाली आहे. या प्रवासात माझ्या बरोबर असणाऱ्या सर्वांचे, माझे कुटुंबीय (विशेषत: माझे आई-वडील सतीश लतूरिया, सीमा लतूरिया, माझे काका श्रीराज लतूरिया, माझा भाऊ सोमेशकुमार लतूरिया, माझे शिक्षक, मार्गदर्शक, माझे मित्र, माझे सहकारी आणि सर्वांचे मनःपूर्वक आभार. दिवस येतील, जातील पण तुम्ही किती मेहनती आहात आणि तुम्ही तुमचे १०० टक्के देत आहात की नाही हे महत्त्वाचे आहे. शेवटी कष्टाचे फळ हे मिळतेच’; असं त्यात लिहिण्यात आलं आहे. तर असा पार्थ लतूरिया याचा उल्लेखनीय प्रवास (Success Story) आहे.