Success Story: हल्ली देशातील अनेक तरुण शहरातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून खेड्यातील शेतीवर लक्ष केंद्रित करीत आहेत. त्यामध्ये ते विविध पद्धतींनी आधुनिक शेती करतात, ज्यात वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न ते कमावतात. आजपर्यंत तुम्ही अशा अनेक प्रगत शेतकऱ्यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेतला असेल. आताही अशाच एका शेतकऱ्याच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

प्रदीप कुमार द्विवेदी हे प्रयागराजचे रहिवासी आहेत. ते सेंद्रिय शेतीतून कोट्यवधी रुपये कमवत आहे. त्यांनी क्विनोआ, मोरिंगा व चिया यांसारख्या पिकांच्या माध्यमातून ४०,००० शेतकऱ्यांना सक्षम केले असून, शेती आणि मूल्यवर्धित उत्पादनांमधून त्यांचे वार्षिक उत्पन्न ४८ कोटी रुपये आहे. हे यश त्यांच्या तांत्रिक पार्श्वभूमी, कॉर्पोरेट अनुभव व शेतीबद्दलच्या आव़ड यांचा परिणाम आहे.

प्रदीप कुमार द्विवेदी हे प्रयागराजचे एक प्रगतिशील शेतकरी आहेत. सेंद्रिय शेतीद्वारे त्यांनी प्रचंड यश मिळवले आहे. त्यांनी कानपूरच्या एचबीटीआयमधून फूड सायन्समध्ये बी.टेक. आणि केमिकल इंजिनियरिंगमध्ये एम.टेक. केले आहे. शेतीत पाऊल ठेवण्यापूर्वी प्रदीप यांना संशोधन व विकास, उत्पादन अभियांत्रिकी, गुणवत्ता विश्लेषण (क्यूए), गुणवत्ता तपासणी (क्यूसी), प्रकल्प व्यवस्थापन या क्षेत्रांत २६ वर्षांचा अनुभव आहे. अन्न, औषधनिर्माण, रसायने, हर्बल व एफएमसीजी यांसारख्या उद्योगांमध्ये काम केले.

शहरातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून केली शेती

प्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये बराच काळ काम केल्यानंतर प्रदीप यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. ते त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होते. अखेर त्यांनी २०१० मध्ये नोकरी सोडण्याचा आणि सेंद्रिय शेतीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी फतेहपूर जिल्ह्यात एकूण ३०० एकर जमिनीवर शेती आणि कंत्राटी शेती सुरू केली. हा उपक्रम एका मजबूत शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमीवर आधारित होता.

दक्षिण अमेरिकेतील पेरूच्या प्रवासादरम्यान प्रदीप यांना क्विनोआ भेटला. त्यांनी भारतीय शेतकऱ्यांना ते सादर करण्याचे ठरवले. त्यांनी फतेहपूरच्या बहुआ गावात चार शेतकऱ्यांबरोबर क्विनोआची लागवड सुरू केली. त्यावरून क्विनोआ लागवडीतील फायदे दिसून आले. सुरुवातीला शेतकऱ्यांना पटवून देणे आणि खरेदीदार शोधणे हे सोपे काम नव्हते. पण, त्यांच्या चिकाटीला फळ मिळाले. आज ते सहा राज्यांमधील ४०,००० शेतकऱ्यांसह काम करतात. ते क्विनोआ, चिया सीड्स, मुळा, शेवगा, आळशी इत्यादींची लागवड करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

प्रदीप यांच्या व्यवसाय धोरणाचा गाभा म्हणजे शेतकऱ्यांना बियाणे, तांत्रिक साह्य. आणि कापणीनंतर प्रक्रिया प्रदान करून, त्यांना आधार देणे. ते शेतकऱ्यांकडून थेट उत्पादन खरेदी करून आणि विक्रीचे व्यवस्थापन स्वतः करून बाजारपेठेतील उपलब्धतेची गंभीर समस्या सोडवतात. प्रदीप यांचे संशोधन आणि विकास पथक कृषी उत्पादनांच्या मूल्यवर्धनावर काम करते. त्यांनी आपला प्रवास पाच लाख रुपयांच्या वार्षिक उलाढालीतून सुरू केला. आज त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल सुमारे ४८ कोटी रुपये आहे. प्रदीप यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट उद्योजक पुरस्कार (२०१६), सर्वोत्कृष्ट नावीन्यपूर्ण सेंद्रिय उत्पादन उत्पादन पुरस्कार (२०१८), सर्वोत्कृष्ट सेंद्रिय शेतकरी पुरस्कार (२०२१) यांचा समावेश आहे. त्यांनी भारतातील क्विनोआ लागवडीवर एक पुस्तकदेखील लिहिले आहे.