TCIL Recruitment 2024 : टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध ‘व्यवस्थापक’ [Manager] पदांवर भरती करण्यात येणार आहे. नेमक्या कोणत्या आणि किती पदांसाठी या ठिकाणी भरती होणार आहे याची माहिती नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी समजून घ्यावी. तसेच, नोकरीचे पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता, वेतन व अर्जाची अंतिम तारीख या सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.
TCIL Recruitment 2024 : पद आणि पदसंख्या
महाव्यवस्थापक [जनरल मॅनेजर E7-स्केल], सहायक महाव्यवस्थापक [असिस्टंट जनरल मॅनेजर E-4 स्केल], व्यवस्थापक [मॅनेजर E-3 स्केल], उपव्यवस्थापक [डेप्युटी मॅनेजर E-2 स्केल] अशी सर्व पदे मिळून एकूण १० रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.
TCIL Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता
सर्व व्यवस्थापक पदांसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/IT/कॉम्प्युटर्स सायन्स/इलेक्ट्रिकल अशा इंजिनियरिंग क्षेत्रातील B.E./B.TECH/M.TECH/MCA चे शिक्षण असणे आवश्यक आहे.
अथवा
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.SC (इंजिनियरिंग)ची पदवी असणे आवश्यक आहे.
TCIL Recruitment 2024 : वेतन
महाव्यवस्थापक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास प्रथम वर्षी दरमहा १,८७,५००/- रुपये वेतन देण्यात येईल.
सहायक महाव्यवस्थापक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास प्रथम वर्षी दरमहा १,४२,३४४/- रुपये वेतन देण्यात येईल.
व्यवस्थापक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास प्रथम वर्षी दरमहा १,२२,००९/- रुपये वेतन देण्यात येईल.
उपव्यवस्थापक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास प्रथम वर्षी दरमहा १,०१,६७५/- रुपये वेतन देण्यात येईल.
उमेदवाराच्या कामाच्या गुणवत्तेनुसार दरवर्षी वेतनवाढ करण्यात येईल.
TCIL Recruitment 2024 – टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अधिकृत वेबसाईट लिंक –
https://www.tcil.net.in/index.php
TCIL Recruitment 2024 – अधिसूचना –
https://www.tcil.net.in/docs/career/07052024a.pdf
TCIL Recruitment 2024 : अर्ज आणि अर्जप्रक्रिया
वरील पदांसाठी नोकरीचा अर्ज पाठविण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज पाठविणाऱ्या उमेदवारांसाठी ५६ वर्षे अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
अर्ज पाठविताना फॉर्ममध्ये उमेदवारांनी आपली संपूर्ण आणि योग्य माहिती भरावी.
तसेच, गरज असल्यास अर्जासह आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी जोडावीत.
उमेदवारांनी नोकरीचा अर्ज अंतिम तारखेआधी पाठवावा.
नोकरीचा अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ३ जून २०२४ अशी आहे.
वरील व्यवस्थापक [मॅनेजर] पदासंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यात, उमेदवारांनी टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीसंबंधीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना वर नमूद केलेली आहे.