TIFR Mumbai Bharti 2024 : टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबईअंतर्गत विविध पदांसाठी ३३ रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांना अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी करण्याची मुभा आहे. तसेच उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. तर अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २३ मार्च असणार आहे.

TIFR Mumbai Bharti 2024 : भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे व पदसंख्या , वयोमर्यादा, पगार, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

navi mumbai municipal corporation steps taken to prevent accidents at tandel maidan chowk in seawoods
वाहतूक बेटासह चौकाचे काँक्रीटीकरण; सीवूड्स येथील तांडेल मैदान चौकात अपघातापासून बचावासाठी महापालिकेचे पाऊल
Central Bureau of Investigation Bharti various vacant posts of Consultants job location is Mumbai
CBI Bharti 2024 : सल्लागार पदासाठी सीबीआयमध्ये पदभरती; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
Pawan Hans released notification for Associate Helicopter Pilot posts Check Details Here
Pawan Hans Bharti 2024: पवन हंस अंतर्गत ‘या’ पदासाठी होणार भरती; चार लाखांपर्यंत मिळणार पगार, असा करा अर्ज

रिक्त पदे आणि पदसंख्या :

इंजिनिअर (डी) [मेकॅनिकल], इंजिनिअर (सी) [विद्युत], वैज्ञानिक अधिकारी (सी), प्रशासकीय अधिकारी (सी)- [दक्षता], वैज्ञानिक अधिकारी (बी), प्रशासकीय सहायक (बी), कनिष्ठ हिंदी अनुवादक, ट्रेडसमन ( B)- [मशिनिस्ट], ट्रेडसमन (B)- [ग्लास ब्लोअर/फिटर], ट्रेडसमन (B)- [टर्नर], ट्रेडसमन (B)- [इलेक्ट्रिशियन], ट्रेडसमन (B) – [सेंट्रल एअर कंडिशनिंग प्लांट मेकॅनिक], ट्रेडसमन (बी) – [सुतार], लिपीक (ए), कुक (बी), कार्य सहायक (तांत्रिक) – [सुतार], कार्य सहायक (सहायक), सुरक्षा रक्षक, तात्पुरते कार्य सहायक, ग्रंथालय प्रशिक्षणार्थी या विविध पदांसाठी ३३ रिक्त जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण : मुंबई</p>

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा : उमेदवाराच्या पदानुसार त्याची शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा अधिसूचनेत नमूद केलेली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.tifr.res.in/

लिंक : https://drive.google.com/file/d/1n_BbQ4bJ9g1WdHdi4uL3hJy8Fwkwt8-i/view

पगार –
इंजिनिअर (डी) [मेकॅनिकल]- १,२७,६३३ रुपये.
इंजिनिअर (सी) [विद्युत] – १,०७,५६५ रुपये.
वैज्ञानिक अधिकारी (सी) – १,०७,५६५ रुपये.
वैज्ञानिक अधिकारी (बी) – ८७,६०४ रुपये.
प्रशासकीय सहायक (बी) – ६६,९४८ रुपये.
कनिष्ठ हिंदी अनुवादक – ६६,४९८ रुपये.
ट्रेडसमन ( B)- [मशिनिस्ट] – ४२,७९७ रुपये.
ट्रेडसमन (B)- [ग्लास ब्लोअर/फिटर] – ४२,७९७ रुपये.
ट्रेडसमन (B)- [टर्नर] – ४२,७९७ रुपये.
ट्रेडसमन (B)- [इलेक्ट्रिशियन] – ४२,७९७ रुपये.
ट्रेडसमन (B) – [सेंट्रल एअर कंडिशनिंग प्लांट मेकॅनिक] – ४२,७९७ रुपये.
ट्रेडसमन (बी) – – ४२,७९७ रुपये.
लिपीक (ए) – ४२, ७९७ रुपये.
कुक (बी) – ३६,४२५ रुपये.
कार्य सहायक (तांत्रिक) – – ३३,६५१ रुपये.
कार्य सहायक (सहायक) – ३३,६५१ रुपये.
सुरक्षा रक्षक – ३३,६५१ रुपये.
तात्पुरते काम सहायक (एकत्रित वेतन) – ३०,१०० रुपये.
ग्रंथालय प्रशिक्षणार्थी (एकत्रित वेतन) – २२,००० रुपये.

हेही वाचा…IREL Recruitment: आयआरईएलमध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती; मुंबईत नोकरी अन् ८८ हजारपर्यंत मिळणार पगार…

ऑफलाइन अर्ज पाठविण्याचा पत्ता- प्रशासकीय अधिकारी (डी), रिक्रुटमेंट सेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल संशोधन, १, होमी भाभा रोड, नेव्हीनगर, कुलाबा, मुंबई- ४००००५.

तर अशा प्रकारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.