सध्या शाळा महाविद्यालयातील परिक्षा जवळ आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. परीक्षेच्या आधी अभ्यासाचं टेन्शन येणं ही अतिशय स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु काहीवेळा परिक्षेची चिंता करणं खूप तणावपूर्ण बनते आणि काही विद्यार्थ्यांसाठी ही चिंता एक फोबिया बनते. परीक्षेचा फोबिया किंवा तणावावर मात करण्यासाठी पालकांनाही काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
परीक्षा जवळ आल्यानंतर मुलांना वाटणारी भीती, चिंता आणि अस्वस्थतेचा त्यांच्या अभ्यासावर आणि स्मरणशक्तीवरही परिणाम होतो. शिवाय परीक्षा अगदी जवळ आली असताना मुलांनी चिंता करायला सुरुवात केली तर त्याचा त्यांच्या अभ्यासावर आणि कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. सर्वात जास्त बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थी फोबियाला बळी पडतात आणि याचा परिणाम त्यांच्या परफॉर्मेंसवर जाणवतो. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेला न घाबरता सामोरं जाण्यासाठी परीक्षेच्या काळात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.
हेही वाचा- ग्रॅज्युएशननंतर पुढे काय? हे कोर्स करा अन् कमवा बक्कळ पैसा, करिअरही होणार सेट
परीक्षेची भिती किंवा तणाव दूर करण्याच्या टिप्स –
घरातील वातावरण आनंदी ठेवा –
मुलांनी शांत मनाने परीक्षा द्यावी, यासाठी घरातील वातावरणही आनंदी असणे आवश्यक आहे. घरात तणावपूर्ण वातावरण असेल कर मुलाची तणावाची पातळी वाढू शकते ज्यामुळे ते परीक्षेत चांगली कामगिरी करू शकणार नाही.
मुलाच्या मनात ‘ही’ गोष्ट ठेवा –
मुलांना सतत हे सांगा की, त्याने परीक्षेला करा किंवा मरो अशी परिस्थिती मानू नये. मात्र, त्याने उत्कृष्ट कामगिरी करावी त्यासाठी खूप प्रयत्नदेखील करावे. परीक्षेच्या बाबतीत त्याने आपली तुलणा इतरांशी करायची नाही. तसंच परीक्षेत पास-नापास होणे किंवा कमी जास्त गुण मिळणे ही काही मोठी गोष्ट नाही, हे मुलांना समजावून सांगा. तसंच बरेच लोक असे आहेत जे कमी गुण मिळवूनही आयुष्यात यशस्वी झाले आहेत.
परीक्षेच्या काळातही मनोरंजन –
हेही वाचा- हस्तमैथुन केल्याने खरंच शुक्राणूंची संख्या कमी होते का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात
परीक्षा येताच मनोरंजनाचे सर्व पर्याय अचानक बंद करणे चुकीचे आहे. मुलाला त्याच्या मनोरंजनासाठी दिवसात किमान १ किंवा २ तास द्यायला हवेत. त्याच्या मदतीने तो जेव्हा अभ्यासाला बसतो तेव्हा तो अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतो. तणाव मुक्त करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
दोन गोष्टी टाळा –
दोन गोष्टी ज्या विद्यार्थ्यांनी कधीही करू नयेत त्या म्हणजे, केवळ पाठांतर करणे आणि अभ्यासाठी रात्रभर जागं राहणे. शालेय विद्यार्थ्यांना ८ तासांपेक्षा जास्त झोप घेणे आवश्यक आहे. रात्रभर जागे राहण्यापेक्षा हे जास्त फायदेशीर ठरले आहे. रात्रीची चांगली झोप मिळाली तर मन ताजे आणि उत्साही राहते. ज्याचा फायदा अभ्यास करताना होतो.
जेवणं टाळू नका –
अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी जेवण टाळणं किंवा स्ट्रेस कमी करण्यासाठी जेवता जेवता अभ्यास करणं या दोन्ही गोष्टी चुकीच्या असून त्याचा आपल्यावर दुष्परिणाम होतो. या काळात सकस संतुलित आहार घ्या. ज्यामुळे अभ्यास करणं सोपं होईल आणि आळसही येणार नाही. तसंच या काळात अक्रोड-बदाम-भोपळा किंवा सूर्यफुलाच्या बियांचे सेवन जरूर करा.
दीर्घ श्वास घ्या –
जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही तणावाखाली आणि चिंताग्रस्त आहात तर ताबडतोब दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा. तुमच्या मनाला समजावून सांगा की तुम्ही घाबरण ही देखील एक परीक्षा आहे आणि तुम्हाला त्यातून बाहेर पडायचे आहे.
सकारात्मक दृष्टीकोन –
परीक्षेला जाण्यापूर्वी कोणतीही घाई करू नका. सर्वकाही व्यवस्थित पॅक करुन ठेवा आणि मगच घरातून बाहेर पडा. गडबडीत परीक्षा केंद्रावर जाऊ नका. कारण गडबडीत काही विसरलं कर पुन्हा तुम्ही गोंधळून जाल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित असून अधिकच्या माहितीसाठी तज्ञाचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या )