scorecardresearch

हस्तमैथुन केल्याने खरंच शुक्राणूंची संख्या कमी होते का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात

Infertility in Men: गर्भधारणेसाठी, स्त्रियांसह पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता चांगली असणे खूप महत्वाचे मानले जाते.

causes of low sperm count
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Low Sperm Count in Marathi: खराब जीवनशैली आणि इतर अनेक कारणे जसे की हार्मोनल असंतुलन, कोणताही रोग, दुखापत, लैंगिक आजार, दीर्घकालीन आरोग्य समस्या, मधुमेह, उच्च तापमानात काम करणे, अनुवांशिक घटक, किंवा औद्योगिक घटक उदाहरणार्थ, रसायने या गोष्टींमुळे पुरुषांमध्ये वंध्यत्व वाढू लागले आहे.

संभोग दरम्यान पुरुष जे शुक्राणू किंवा वीर्य सोडतो त्यात सामान्यपेक्षा कमी शुक्राणू असतात आणि या स्थितीला ऑलिगोस्पर्मिया म्हणतात. शुक्राणूंची संख्या सामान्य असावी, कारण महिलांमधील अंडाशय पेनीट्रेट साठी पुढे येत नाही. उलट पुरुषांमधील स्पर्म महिलांच्या अंडाशयामध्ये पेनीट्रेट करतात. म्हणून, जेव्हा शुक्राणूंची संख्या सामान्यपेक्षा कमी असते, तेव्हा पुरुषांचे एग पेनिट्रेट करू शकत नाही, ज्यामुळे पुरुष वंध्यत्वास कारणीभूत ठरतात.

शुक्राणूंची संख्या कशामुळे कमी होते?

क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, सेक्सोलॉजिस्ट डॉ. शर्मिला मजुमदार यांच्या मते, पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत, परंतु त्यातील पहिले कारण म्हणजे बायोलॉजीकल कारणांमध्ये व्हॅरिकोसेल, शुक्राणूंच्या नलिकांमधील कोणतीही समस्या, संप्रेरक असंतुलन, नलिका खराब होणे, संसर्ग इत्यादी असू शकतात. याशिवाय, ट्रक चालवणे, वेल्डिंग करणे यासारखी इतर काही कारणे आहेत ज्याचा शुक्राणूंच्या उत्पादनावर परिणाम होतो. कधीकधी रेडिएशन, गरम टबमध्ये आंघोळ, एक्स-रे, धूम्रपान, मद्यपान, कामाचा जास्त दबाव, झोप न लागणे यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते.

हस्तमैथुन केल्याने शुक्राणूंची संख्या कमी होते का?

डॉ. जय मेहता, वैज्ञानिक संचालक, श्री IVF क्लिनिक मुंबई यांच्या मते, हस्तमैथुन ही एक अतिशय सामान्य लैंगिक सवय आहे जी पुरुषांना १४-१५ वर्षे वयापासून सुरू होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हस्तमैथुन आणि शुक्राणूंची कमी संख्या यांच्यात कोणताही संबंध नाही. मानवी शरीरात दररोज अब्जावधी शुक्राणूंची निर्मिती होते. जेव्हा कोणी हस्तमैथुन करतो तेव्हा वीर्य बाहेर पडते, जो शरीरात तयार होणारा स्राव असतो. वीर्य स्रावामध्ये शुक्राणूंव्यतिरिक्त इतर अनेक घटक असतात जसे की पाणी, फ्रक्टोज, पेशी, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे. लोकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की वारंवार हस्तमैथुन केल्याने शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. जर एखाद्याचे शुक्राणू उत्पादन सामान्य असेल तर हस्तमैथुन केल्याने ते अजिबात कमी होणार नाही. जर तुम्ही वारंवार हस्तमैथुन करत असाल तर शुक्राणूंच्या संख्येवर कोणताही परिणाम होत नाही, परंतु शुक्राणूंच्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो.

शुक्राणू चाचणी

नैसर्गिक असुरक्षित संभोगाच्या एक वर्षानंतर देखील गर्भधारणा होत नाही, तेव्हा स्त्री आणि पुरुष दोघांनाही प्रजननक्षमतेची चाचणी घ्यावी लागते. स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा वंध्यत्व सल्लागार वीर्य विश्लेषण चाचणी घेतात. ज्यामध्ये कमी शुक्राणूंच्या संख्येच्या आधारे ऑलिगोस्पर्मियाचे निदान केले जाते.

( हे ही वाचा: किडनीचे रुग्ण हळदीचे सेवन करू शकतात का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात)

शुक्राणूंची संख्या कमी होण्याची लक्षणे

युरोलॉजी आणि एंड्रोलॉजी केअर, नवी दिल्लीचे डॉ. विजयंत गोविंदा गुप्ता यांच्या मते, शुक्राणूंची संख्या कमी होण्याच्या मुख्य लक्षणांपैकी एक म्हणजे गर्भधारणेमध्ये समस्या येत आहेत. याशिवाय इतर कोणतीही चिन्हे किंवा लक्षणे दिसत नाहीत. काही पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात, जसे की हार्मोन्समध्ये बदल किंवा शुक्राणूंच्या मार्गात अडथळा.

सामान्य शुक्राणूंची संख्या काय आहे

डॉ. विजयंत गोविंदा यांच्या मते, पुरुषाच्या शुक्राणूमध्ये सामान्य शुक्राणूंची संख्या १५ दशलक्ष शुक्राणूंपासून ते २०० दशलक्ष शुक्राणू प्रति मिली असते. जर एखाद्या पुरुषाच्या वीर्यामध्ये १.५ दशलक्ष पेक्षा कमी शुक्राणू असतील तर त्याला शुक्राणूंची संख्या कमी होण्याची समस्या आहे.

शुक्राणूंची संख्या कशी वाढवायची

  • निरोगी आहार
  • धूम्रपान टाळा
  • दारू टाळा
  • विश्रांती घ्या
  • व्यायाम
  • लॅपटॉप आणि मोबाईलचा अतिवापर टाळा
  • स्टिरॉइडचा गैरवापर करू नका
  • औषधांचा ओव्हरडोज टाळा
  • व्हॅरिकोसेलसाठी योग्य उपचार घ्या

डॉ.विजयंत गोविंदा यांच्या मते, औषधे आणि उपचारांनी शुक्राणूंची कमतरता दूर केली जाऊ शकते.

( हे ही वाचा: खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट अटॅक येऊ शकतो; ‘या’ एका गोष्टीने वेळीच करा कंट्रोल)

शुक्राणू वाढवण्यासाठी काय खावे

आचार्य बालकृष्ण यांच्यानुसार शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी या गोष्टींचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. मका, बाजरी, जुना तांदूळ, गहू, नाचणी, ओट्स आणि तृणधान्यांमध्ये सोयाबीन, मूग, मसूर, उडीद, हरभरा यांचा समावेश केल्यास शुक्राणूंची संख्या वाढू शकते. तसेच, फळे आणि भाज्यांमध्ये पडवळ, कडू, भोपळा, गाजर, बीटरूट, ब्रोकोली, कोबी, बदाम, खजूर, आंबा, द्राक्षे, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, अंजीर, डाळिंब यांचा समावेश करण्यास विसरू नका.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 15:32 IST
ताज्या बातम्या