युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (यूपीएससी) मार्फत एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ), (मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट) मधील एन्फोर्समेंट ऑफिसर/अकाऊंट्स ऑफिसर आणि असिस्टंट प्रोव्हिडंट कमिशनर (एपीएफसी) पदांची सिलेक्शन पद्धतीने भरती. एकूण रिक्त पदे – २३०.
(१) एन्फोर्समेंट ऑफिसर/अकाऊंट्स ऑफिसर Group-B Non-Ministria – एकूण १५६ पदे (अजा – २३, अज – १२, इमाव – ४२, ईडब्ल्ड्यूएस – १, खुला – ७८) दिव्यांग उमेदवारांसाठी ९ पदे राखीव. कॅटेगरी B/LV – ५ पदे, D/HH – ३ पदे, SLD/MI – १ पद.
पात्रता – ( १७ मार्च २०२३ रोजी) कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.
वयोमर्यादा – ( १८ ऑगस्ट २०२५ रोजी) ३० वर्षे.
वेतन – पे-स्केल लेव्हल – ८, अंदाजे वेतन दरमहा रु. ९२,२००/-.
(२) असिस्टंट प्रॉव्हिडंट फंड कमिशनर (APFC) (Group-A) – एकूण ७४ पदे (अजा – ७, इमाव – २८, ईडब्ल्ड्यूएस – ७, खुला – ३२) (अपंग उमेदवारांसाठी ३ पदे राखीव. D/HH – १, LD/CP – १, SLD/MI – १).
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.
इष्ट पात्रता – कंपनी लॉ/लेबर लॉ/पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमधील डिप्लोमा.
वयोमर्यादा – ( १८ ऑगस्ट २०२५ रोजी) ३५ वर्षे.
वेतन – पे-स्केल लेव्हल – १०, अंदाजे वेतन दरमहा रु. १,१३,२००/-.
कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे.
प्रोबेशन – निवडलेले उमेदवार २ वर्षांच्या प्रोबेशनवर नेमले जातील.
निवड पद्धती – परीक्षा – पेन आणि पेपर मोडने हिंदी/इंग्रजी माध्यमातून ऑब्जेक्टिव्ह टाईप एमसीक्यू. सर्व प्रश्नांस सारखे गुण असतील. वेळ २ तास. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील.
(१) जनरल इंग्लिश, (२) इंडियन कल्चर, हेरिटेज अँड फ्रीडम मूव्हमेंट, (३) गव्हर्नन्स आणि भारतीय राज्य घटना, (४) डेव्हलपमेंटल इश्युज अँड प्रेझेंट ट्रेंड्स इन इंडियन इकॉनॉमी, (५) प्रिन्सीपल्स ऑफ अकाऊंटन्सी अँड ऑडिटींग अँड इश्युरन्स, (६) कॉम्प्युटर अॅप्लिकेशन व जनरल सायन्सचे बेसिक नॉलेज, (७) प्राथमिक गणित, स्टॅटिस्टिक्स आणि जनरल मेंटल
ॲबिलिटी, (८) इंडस्ट्रियल रिलेशन्स, लेबर लॉज अँड सोशल सिक्युरिटी इन इंडिया, (९) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी.
लेखी परीक्षा पात्रतेचे निकष खुला/ईडब्ल्यूएस किमान ५० टक्के गुण, इमाव – ४५ गुण, अजा/अज – ४० गुण
इंटरव्ह्यू – लेखी परीक्षेतील पात्र उमेदवारांना १०० गुणांचा इंटरव्ह्यू द्यावा लागेल.
अंतिम निवडीसाठी लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूचे गुण ७५ः२५ प्रमाणात एकत्रित केले जातील.
शंकासमाधानासाठी हेल्पलाईन फोन नं. ०११२४०४१००१ (कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.०० ते १७.३० वाजेपर्यंत).
फॉर्म भरताना काही तांत्रिक अडचणी आल्यास upscoap@nic.in या ई-मेल आयडीवर संपर्क साधू शकतात.
ऑनलाइन अर्ज https://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर १८ ऑगस्ट २०२५ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.