UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरीची मोठी संधी चालून आली आहे. या विभागात तब्बल १९३० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी उमेदवार २७ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करु शकतात. परंतु उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी रिक्त पदासाठीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाचे शुल्क याची तपशील माहिती जाणून घ्यावी.

रिक्त पदांची संख्या :-

१९३०

पदाचा तपशील :-

नर्सिंग ऑफिसर

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातून Bsc (hons. किंवा B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM शाखेतील पदवी असलेला उमेदवार अर्ज करु शकतो. मात्र त्याकडे ०१ वर्ष कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

उमेदवाराचा वय २७ मार्च २०२४ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षांपर्यंत असावे. यात नियमाप्रमाणे OBC विद्यार्थ्यांना ०३ वर्षाची तर SC, ST उमेदवारांना ०५ अतिरिक्त सुट आहे.

नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत

अर्जाचे शुल्क

सर्वसाधारण, ओबीसी व EWS – २५ रुपये
SC, ST,अपंग व महिला – कोणतेही शुल्क नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर पाहा – वेबसाईट लिंक

जाहिरात – पाहा

ऑनलाईन अर्ज – अर्ज करण्यासाठी लिंक