केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) द्वारा केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये ग्रुप-ए/ग्रुप-बी मधील ४७४ इंजिनिअर्सच्या भरतीसाठी इंजिनीअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन (ईएसई)-२०२६ दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेणार आहे. (१) कॅटेगरी – १ – सिव्हील इंजिनीअरिंग (२) कॅटेगरी – २ – मेकॅनिकल इंजिनीअरिंग
(३) कॅटेगरी – ३ – इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (४) कॅटेगरी – ४ – इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग
रिक्त पदे – एकूण ४७४ (२६ पदे अपंगांसाठी राखीव).
यामधून पुढील केंद्र सरकारच्या विविध खात्यांमधील ग्रुप ‘ए’/ग्रुप ‘बी’ सर्व्हिसेसमध्ये निवड केली जाईल. (१) सेंट्रल इंजिनीअरिंग सर्व्हिस (रोड्स) ग्रुप-ए (सिव्हील इंजिनीअरिंग पोस्ट्स), (२) बॉर्डर रोड इंजिनीअरिंग सर्व्हिस (सिव्हील मेकॅनिकल), (३) डिफेन्स एअरोनॉटिकल QAS सर्व्हिस (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलि), (४) मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिस (सर्व्हेअर कॅडर) (सिव्हील), (५) जीएस्आय् इंजिनीअरिंग सर्व्हिस, (मेकॅनिकल), (६) इंडियन नेव्हल मटेरियल मॅनेजमेंट सर्व्हिस (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन), (७) ज्युनियर टेलीकॉम ऑफिसर ग्रुप-बी (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन), (८) सेंट्रल वॉटर इंजिनीअरिंग (ग्रुप-ए) सर्व्हिस (सिव्हील मेकॅनिकल), (९) इंडियन टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस ग्रुप-ए, (१०) इंडियन रेडिओ रेग्युलेटरी सर्व्हिस ग्रुप-ए, (११) इंडियन स्किल डेव्हलपमेंट सर्व्हिस, (१२) इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस (सिव्हील/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन), (१३) इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस (स्टोअर्स) (सिव्हील/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग पोस्ट्स) इ.
पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी किंवा इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) (IEI)/इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स (इंडिया) (IE & TE)/एअरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया (ASI) यांचेकडील मेंबरशिप एक्झामिनेशन उत्तीर्ण. याशिवाय (i) इंडियन नेव्हल आर्मामेंट सर्व्हिस (इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग) पदांसाठी पुढील पात्रताधारक उमेदवारसुद्धा पात्र आहेत. एम्.एस्सी. (वायरलेस कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स/रेडिओ फिजिक्स किंवा रेडिओ इंजिनीअरिंग या स्पेशल विषयासह) (ii) (इंडियन रेडिओ रेग्युलेटरी सर्व्हिस ग्रुप-ए पदांसाठी एम्.एस्सी. (फिजिक्स अँड रेडिओ कम्युनिकेशन/वायरलेस कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स/ टेली कम्युनिकेशन/रेडिओ फिजिक्स/रेडिओ इंजिनीअरिंग)) उमेदवार पात्र आहेत.
वयोमर्यादा – ( १ जानेवारी २०२६ रोजी) २१ ते ३० वर्षे. (इमाव – ३३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३५ वर्षेपर्यंत, अपंग – ४०/४३/४५ वर्षेपर्यंत)
निवड पद्धती – स्टेज-१ – इंजिनीअरिंग सर्व्हिसेस प्रीलिम एक्झाम (दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी) स्टेज-२ – करिता उमेदवार निवडण्यासाठी पेपर-१ – २०० गुण (जनरल स्टडीज अँड इंजिनीअरिंग अॅप्टिट्यूड टेस्ट) वेळ २ तास आणि पेपर-२ – ३०० गुण (संबंधित इंजिनीअरिंग विषयावर आधारित प्रश्न) वेळ ३ तास. एकूण ५०० गुण (ऑब्जेक्टिव्ह टाईप). ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नांकरिता चुकीच्या उत्तरांसाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील.
इंजिनीअरिंग सर्व्हिसेस (प्रीलिमिनरी) परीक्षेसाठी केंद्र – मुंबई, नागपूर, पणजी (गोवा) इ. देशभरातील ५० केंद्र्रं.
स्टेज-२ – मुख्य परीक्षा – दोन कन्व्हेंशनल टाईप पेपर्स – एकूण ६०० गुण इंजिनीअरिंग शाखेवर आधारित प्रत्येकी ३०० गुण, ३ तास कालावधी.
मुख्य परीक्षेसाठी केंद्र – मुंबई, अहमदाबाद, भोपाळ इ. देशभरातील २४ केंद्रं.
स्टेज-३ – मुलाखत (Personality Test) – २०० गुण. यामध्ये उमेदवारांची नेतृत्व क्षमता, पुढाकार आणि बौद्धिक कुतूहल, चातुर्य आणि सामाजिक गुण, मानसिक आणि शारीरिक ऊर्जा, व्यावहारिक प्रशिक्षण, चारित्र्याची अखंडता तपासली जाईल.
इंजिनीअरिंग सर्व्हिसेस (प्रीलिमिनरी) एक्झाम स्टेज-१, इंजिनीअरिंग सर्व्हिसेस (मेन) एक्झाम स्टेज-२ आणि मुलाखत – स्टेज-३ यातील एकत्रित गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल.
स्टेज-४ – मेडिकल एक्झामिनेशनची तारीख/ठिकाण/निकाल इ. माहिती नंतर जाहीर केली जाईल. यूपीएससीने प्रसिद्ध केलेल्या निवड यादीतील उमेदवारांना मेडिकल एग्झाम द्यावी लागेल.
अर्जाचे शुल्क – रु. २००/-. (महिला/अजा/अज/अपंग यांना फी माफ आहे.) ऑनलाइन मोडने फी दि. १६ ऑक्टोबर २०२५ (१८.०० वाजे)पर्यंत भरता येईल.
इमाव आणि ईडब्ल्यूएस दाखले २०२४-२५ करिता दि. १ एप्रिल ते १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान जारी केलेले असावेत.
शंकासमाधानासाठी संपर्क दूरध्वनी क्र. ०११-२३३८५२७१/२३३८११२५/२३०९८५४३ (कार्यालयीन वेळेत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत).
हेल्पडेस्क नं. ०११-२४०४१००१.
ऑनलाइन अर्ज http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर १६ ऑक्टोबर २०२५ (१८.०० वाजे)पर्यंत करावेत.