UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो. या अंतर्गतच आम्ही ‘लोकसत्ता टेस्ट सिरीज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे तुमच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते. तसेच त्याची उत्तरेही खाली दिली जातात.

प्रश्न क्र. १

खालील विधाने विचारात घ्या :

अ) या देशाने भारत सरकारला त्याच्या भूमीवरील भारतीय लष्कर मागे घेण्यास सांगितले आहे.

ब) या देशाने भारताबरोबर करण्यात आलेल्या जलविज्ञान सर्वेक्षण कराराचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.

क) या देशाकडे भारताने आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि आपत्ती निवारण कार्यासाठी प्रदान केलेली दोन हेलिकॉप्टर्स व एक विमान आहे.

वरील विधाने कोणत्या देशाशी संबंधित आहेत?

अ) मॉरिशस

ब) सेशेल्स

क) मालदीव

ड) श्रीलंका

प्नश्न क्र. २

खालीलपैकी कोणत्या देशाला भारताने भूकंपग्रस्त भागाच्या पुनर्निर्माणासाठी ७५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे?

अ) नेपाळ

ब) जपान

क) अफगाणिस्तान

ड) टर्की

हेही वाचा – UPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – ३६

प्रश्न क्र. ३

इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स (ECOWAS) संदर्भात खालील विधानांचा विचार करा :

१) हा एक प्रादेशिक गट आहे; ज्याची स्थापना १९७५ मध्ये लागोस कराराद्वारे करण्यात आली होती.

२) आफ्रिकन स्टेट्समध्ये एकसमान चलन असावे, हे या गटाचे उद्दिष्ट आहे.

३) सिएरा लिओन (Sierra Leone) या गटाचा सदस्य नाही.

४) सीमाविरहित प्रदेशांची निर्मिती करणे हे या गटाचे उद्दिष्ट आहे.

वरील विधानांपैकी किती विधाने योग्य आहेत?

अ) फक्त एक

ब) फक्त दोन

क) फक्त तीन

ड) चारही

प्रश्न क्र. ४

खालील देशाांचा विचार करा :

अ) ओमान

ब) इजिप्त

क) यूएई (UAE)

ड) सौदी अरेबिया

वरीलपैकी किती देशांच्या सीमा यमनला लागून आहेत?

अ) फक्त एक

ब) फक्त दोन

क) फक्त तीन

ड) चारही

प्रश्न क्र. ५

खालील जोड्या विचारात घ्या :

ठिकाणदेश
इशिकावा ( Ishikawa)दक्षिण कोरिया
आचे (Aceh)मलेशिया
बेल्गोरोड (Belgorod)रशिया

वरीलपैकी किती जोड्या योग्य आहेत?

अ) फक्त एक

ब) फक्त दोन

क) तिन्ही योग्य

ड) एकही नाही

हेही वाचा – UPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सिरीज – ३४

वरील प्रश्नांची उत्तरे :

प्रश्न क्र. १ (क)

१) मालदीवने भारत सरकारला त्यांच्या भूमीवरील भारतीय लष्कर मागे घेण्यास सांगितले आहे.

२) मालदीवने भारताबरोबर करण्यात आलेल्या जलविज्ञान सर्वेक्षण कराराचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. ८ जून २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या निमंत्रणावरून मालदीवला भेट दिली होती. त्यावेळी दोन्ही देशांनी या करारावर स्वाक्षरी केली होती. जलविज्ञान सर्वेक्षण हे जहाजांद्वारे केले जाते. त्याद्वारे जलसंस्थेची विविध वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी सोनारसारख्या पद्धतीचा वापर केला जातो.

३) भारताने मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलाला आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि आपत्ती निवारण कार्यासाठी दोन हेलिकॉप्टर्स आणि एक विमान दिले आहे.

त्यामुळे पर्याय (क) हे उत्तर योग्य आहे.

प्रश्न क्र. २ (अ)

तुमच्या माहितीसाठी :

१) परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नेपाळ भेटीदरम्यान गेल्या वर्षी भूकंपामुळे प्रभावित झालेल्या भागाच्या पुनर्निर्माणासाठी भारत ७५ दशलक्ष अमेरिकन डॉलरची मदत करणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी बोलताना, भारत आपल्या शेजारी देशांच्या मदतीसाठी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पश्चिम नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती.

त्यामुळे पर्याय (अ) योग्य आहे.

प्रश्न क्र. ३ (क)

१) द इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स (ECOWAS) हा एक प्रादेशिक गट आहे; ज्याची स्थापना १९७५ मध्ये लागोस कराराद्वारे करण्यात आली होती. त्यामुळे विधान १ योग्य आहे.

२) सीमाविरहित प्रदेशांची निर्मिती करणे, हे द इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्सचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे विधान ४ योग्य आहे. या गटाला फ्रान्समध्ये CEDEAO म्हणून ओळखले जाते.

३) द इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स या गटात १५ सदस्य आहेत. ते पुढीलप्रमाणे : बेनिन (Benin), बुर्किना फासो ( Burkina Faso), केप वर्डे (Cape Verde), कोटे डी’आयव्होअर ( Cote d’ Ivoire), द गॅम्बिया (The Gambia), घाना (Ghana), गिनी (Guinea), गिनी बिसाऊ (Guinea Bissau), लायबेरिया (Liberia), माली (Mali), नायजर (Niger), नायजेरिया (Nigeria), सिएरा लिओन (Sierra Leone), सेनेगल व टोगो (Senegal and Togo) त्यामुळे विधान ३ अयोग्य आहे.

४) आफ्रिकन स्टेट्समध्ये एकसमान चलन असावे आणि सीमाविरहित प्रदेशांची निर्मिती करणे, हे या गटाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे विधान २ व ४ योग्य आहे.

त्यामुळे पर्याय (क) हे उत्तर योग्य आहे.

प्रश्न क्र. ४ – (ब)

यमनच्या उत्तरेला सौदी अरेबिया आणि ईशान्येला ओमान हे देश आहेत. त्याशिवाय यमन इरिट्रिया (Eritrea), जिबुती (Djibouti) व सोमालिया (Somalia) या देशांबरोबर सागरी सीमा सामायिक करतो. तसेच यमनच्या पश्चिमेला लाल समुद्र आणि दक्षिणेला अरबी समुद्र आहे.

त्यामुळे पर्याय (ब ) हे उत्तर योग्य आहे.

प्रश्न क्र. ५ (अ)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
इशिकावाजपान
आचेइंडोनेशिया
बेल्गोरोडरशिया

त्यामुळे पर्याय (अ) हे उत्तर योग्य आहे.