महाराष्ट्र वन विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे वन विभागाने काही जागांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत, लेखपाल (गट क), सर्वेक्षक, उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब), निम्न श्रेणीतील लघुलेखक (गट ब), कनिष्ठ अभियंता स्थापत्य (गट ब), वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क), कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क). या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांना त्यांचे अर्ज https://mahaforest.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन भरता येणार आहेत. महाराष्ट्र वन विभाग भरती मंडळाने जून २०२३ च्या जाहिरातीत एकूण २७९ रिक्त पदांची घोषणा केली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची मुदत याबाबतची माहिती जाणून घेऊया.
महाराष्ट्र वन विभाग भरती २०२३ –
एकूण रिक्त पदे – २७९
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग १८ ते ४० वर्षे.
मागासवर्गीय/अनाथ – १८ ते ४५ वर्षे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.
अर्ज फी –
खुला प्रवर्ग – १००० रुपये.
मागासवर्गीय/अनाथ – ९०० रुपये.
माजी सैनिकांना कोणतेही अर्ज शुल्क नाही.
महत्वाच्या तारखा –
- अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – १० जून २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून २०२३
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
हेही वाचा- पुणे महापालिकेअंतर्गत ५८१ पदांसाठी होणार भरती, ‘इतका’ मिळेल पगार, १५ जूनपूर्वी ऑनलाइन भरा अर्ज
लेखपाल / लेखापाल (गट क) – मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक.
सर्वेक्षक – १२ वी पास आणि मान्यताप्राप्त संस्थेचे सर्वेक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रमाणपत्र आणि मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक.
उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब) – माध्यमिक शाळांमधील प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, प्रति शब्द किमान १२० शब्दांच्या लघुलेखनात प्राविण्य, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
लोअर ग्रेड स्टेनोग्राफर (गट बी) – माध्यमिक शाळांमध्ये प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, प्रति शब्द किमान १०० शब्दांच्या शॉर्टहँड गतीमध्ये प्रवीणता, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
ज्युनिअर अभियंता सिव्हिल (Gr. B) – स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा, मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक.
वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क): गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून सांख्यिकी या विषयातील पदव्युत्तर पदवी, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क): गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील सांख्यिकी या विषयातील पदव्युत्तर पदवी, मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक.
अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/