scorecardresearch

इंजिनियरिंग उत्तीर्ण तरुणांना नोकरीची मोठी संधी; ५० हजार मिळेल पगार, जाणून घ्या भरतीची प्रक्रिया

WAPCOS Jobs 2023: या भरती मोहिमेद्वारे १५० हून अधिक पदांची भरती केली जाईल. त्यासाठी उमेदवार २ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात. इतर महत्त्वाचे तपशील जाणून घ्या.

Wapcos Recruitment
फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम

WAPCOS Recruitment 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. WAPCOS लिमिटेड ने अनेक पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २ फेब्रुवारी २०२३ आहे. अधिसूचनेनुसार, ही मोहीम १६१ पदांच्या भरतीसाठी चालवली जात आहे. इंजिनिअर, साईट इंजिनीअरसह इतर अनेक पदे या मोहिमेद्वारे भरण्यात येणार आहेत.

अर्जासाठी कोण पात्र आहे?

अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून इंजिनीयरिंग केलेले असणे आवश्यक आहे. इतर तपशील जाणून घेण्यासाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइटवर दिलेली सूचना तपासू शकता. येथून तुम्हाला तपशील मिळेल.

वयोमर्यादा किती आहे?

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांचे वय ३५ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे. तर आरक्षित प्रवर्गाला शासकीय नियमानुसार वयात सवलत दिली जाईल. तुम्ही बघू शकता की, या भरतीची खास गोष्ट म्हणजे वृद्ध उमेदवारही त्यांच्यासाठी अर्ज करू शकतात. म्हणून, तुम्हीही इच्छुक असल्यास उशीर करू नका आणि शक्य तितक्या लवकर फॉर्म भरा.

किती असेल पगार?

या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना १८,०० ते ५०,०० रुपये प्रति महिना पगार दिला जाईल.

( हे ही वाचा: १० वी पास आहात? India Post मध्ये ४० हजारहून अधिक पदांसाठी मोठी भरती; आजच अर्ज भरा)

अशा प्रकारे होईल निवड

या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखत आणि कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल. एक टप्पा पार करणार्‍या उमेदवारांनाच पुढच्या टप्प्यासाठी बोलावले जाईल आणि जे सर्व परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांची अंतिम निवड केली जाईल.

अर्ज कसा करावा

ज्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट http://www वर भेट देऊ शकतात. शेवटच्या तारखेपूर्वी तुम्ही wapcos.gov.in/ द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात. हे देखील जाणून घ्या की ऑनलाइन व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 19:04 IST

संबंधित बातम्या