भारत कुकिंग कोल लिमिटेडमध्ये ज्युनिअर ओव्हरमनच्या ३१० जागा – उमेदवार मायनिंग इंजिनीअिरगमधील पदविकाधारक, ओव्हरमनविषयक पात्रताधारक व गॅस टेस्टिंगमधील प्रमाणपत्र प्राप्त असायला हवेत. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ११ ते १७ जून २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली भारत कुकिंग कोलची जाहिरात पाहावी अथवा http://www.bul.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जुलै २०१६.

टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथे सायंटिफिक असिस्टंटच्या २ जागा- अधिक माहिती व तपशिलासाठी  http://tmc.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०१६.

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024 Date Time in Marathi
१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या
Success story Meet woman, who cracked UPSC exam without coaching
कोणताही क्लास न लावता मारली बाजी; IAS सरजना यांचा प्रेरणादायी प्रवास, विद्यार्थ्यांना दिल्या खास टिप्स
Two minor girls molested in a private tutoring class in nashik
नाशिक : खासगी शिकवणी वर्गात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

सेमी कंडक्टर लॅबोरेटरी, पंजाब येथे सायंटिस्ट/ इंजिनीअर (केमिकल) च्या २ जागा – उमेदवारांनी केमिकल इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा कमीत कमी ६५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ ते २४ जूनच्या अंकात प्रकाशित झालेली सेमिकंडक्टर लॅबोरटरीची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज सीनिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, पी अ‍ॅण्ड जी ए (एस्टॅब्लिशमेंट) सेमिकंडक्टर लॅबोरेटरी, सेक्टर-६२, एमएएस नगर १६००७१ (पंजाब) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०१६.

भारतीय वायुसेना- पुणे येथे कर्मचाऱ्यांच्या ५ जागा- अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांना संबंधित कामाचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा २७ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ ते २४ जून २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुसेनेची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज कमांडंट- अ‍ॅडमिन, एअरफोर्स स्टेशन- लोहगाव, पुणे- ४११०३२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०१६.

टाटा मेमोरियल सेंटर, परळ-मुंबई येथे परिचारिकांच्या ६० जागा- अधिक माहिती व तपशिलासाठी http://tmc.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०१६.

संरक्षण मंत्रालयांतर्गत सिकंदराबाद येथे शिपायांच्या १५ जागा– उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ११ ते १७ जून २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, ईएमई रेकॉर्ड्स, त्रिमुलर्घेी, सिकंदराबाद-५०००१५ (तेलंगण) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० जुलै २०१६.

आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन येथे आदिवासी विकास सहयोगी पदाच्या १८ जागा – अधिक माहिती व तपशिलासाठी http://www.maharashtra.gov.in अथवा http://www.geexam.com या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०१६.

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नौदलात भर्ती होऊन बीटेक करण्याची संधी- अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित विषयांसह व कमीत कमी ७०% गुण मिळवून उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा १९.५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ ते २४ जून २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय नौदलाची जाहिरात पाहावी अथवा नौदलाच्या http://www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०१६.

भारतीय वायुसेनेत हवामानशास्त्र शाखेतील (Meterology Branch) कोर्स जुल २०१७ पासून सुरू होणार. पात्रता – पदवी कोणत्याही विज्ञान शाखेतील गणित, संख्याशास्त्र, जीओग्राफी, कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन/ अ‍ॅप्लाईड फिजिक्स इत्यादी सरासरी किमान ५०. गुणांसह उत्तीर्ण. (जर का पदवी परीक्षेस फिजिक्स आणि गणित विषय असल्यास प्रत्येकात किमान ५५. गुण आवश्यक.) वयोमर्यादा – १ जुल २०१७ रोजी २० ते २६ वष्रे. उंची – १५७.५ सें.मी. पुरुषांसाठी, १५२ सें.मी. महिलांसाठी. निवड पद्धती – पदवी परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार वायुसेना निवड मंडळाच्या (AFSBs) टेस्टसाठी निवडले जातील. जी दोन स्टेजेसमध्ये होईल. प्रशिक्षण कालावधी – ५२ आठवडे. वेतन – ६६,७३८ रुपये प्रतिमाह. इतर फायदे – उमेदवारांचा ७५ लाखांचा विमा उतरला जाईल. अर्ज कसा करावा – विहीत नमुन्यात (एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८ जून २०१६ च्या अंकात दिलेल्या प्रारूपानुसार) पूर्ण भरलेले अर्ज ‘पोस्ट बॅग नं. ००१, निर्माण भवन पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली – ११० १०६’ या पत्त्यावर साध्या पोस्टाने १६ जुल २०१६ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

सशस्त्र सीमा बल, गृहमंत्रालय (जाहिरात क्र. २९३/२०१६) कॉन्स्टेबल ड्रायव्हर – (७३१ पदे), कुक (३४९ पुरुष, ६० महिला), वॉशरमन (१७० पुरुष, ३० महिला), बार्बर (८२ पुरुष, १५ महिला), सफाईवाला (१७६ पुरुष, ३० महिला), वॉटर कॅरियर (३९५ पुरुष, ३० महिला) च्या एकूण २०६८ पदांची भरती. पात्रता – १० वी उत्तीर्ण संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव किंवा संबंधित ट्रेडमधील आयटीआय् कोर्स उत्तीर्ण. ड्रायव्हरसाठी अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक. ड्रायव्हरसाठी वयाची अट २१ ते २७ वष्रे. इतर पदांसाठी १८ ते २३ वष्रे. शारीरिक मापदंड – ड्रायव्हरसाठी उंची – १७० सें.मी., छाती – ८०-८५ सें.मी., अनुसूचित जमातींसाठी उंची – १६२.५ सें.मी., छाती – ७६-८१ सें.मी., इतर पदांसाठी – उंची – पुरुष – १६७.५ सें.मी., छाती – ७८-८३ सें.मी., उंची अज साठी – १६२.५ सें.मी., छाती. ७६-८१ सें.मी., महिला उंची – १५७ सें.मी. (अज १५० सें.मी.). परीक्षा शुल्क – ५० रु. निवड पद्धती – (i) शारीरिक क्षमता चाचणी – पुरुष – ४.८ कि.मी. अंतर २४ मिनिटांत धावणे. महिला – २.४ कि.मी. अंतर १८ मिनिटांत धावणे. (ii) लेखी परीक्षा – १०० गुणांची वस्तुनिष्ठ. बहुपर्यायी स्वरूपाची दोन तास कालावधीसाठी सामान्यज्ञान, गणित, इंग्रजी, हिंदी, बुद्धिमत्ता चाचणी (कारणे). या विषयांवर आधारीत प्रश्न. (iii) ट्रेड टेस्ट – ५० गुणांसाठी. अंतिम निवड लेखी परीक्षा आणि ट्रेड टेस्टमधील गुणवत्तेनुसार. अर्ज कसा करावा – विहीत नमुन्यातील अर्ज जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह १७ जुल २०१६ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. अर्जाचा नमुना http://www.ssbrectt.gov.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येईल. एम्लॉयमेंट न्यूडच्या १८ जून २०१६ च्या अंकात पाहता येईल.

संघ लोकसेवा आयोग (युपीएस्सी) ‘स्टॅटिस्टीकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-क’ पदांची सरळसेवा भरती करणार आहे. एकूण पदे – १७ (अजा – ३, अज – १, इमाव – ३, अराखीव – १०) पात्रता – संख्याशास्त्र विषयातील किंवा गणित/अर्थशास्त्र/ वाणिज्यमधील (संख्याशास्त्र विषयासह) पदव्युत्तर पदवी. इष्ट पात्रता – (i) पदव्युत्तर पदवी किमान दुसऱ्या वर्गात उत्तीर्ण. (ii) सांख्यिकीय माहिती गोळा करणे, टॅब्युलेशन करणे, विश्लेषण करणे आणि अर्थ लावणेचा २ वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा – ३० वष्रे. वेतन – ९,३००-३४,८०० रु. (पे बँड – २) ४,६०० रु. ग्रेड पे एकूण ४७,३०७ रु. अर्ज कसा करावा – ऑनलाईन रिक्रुटमेंट अ‍ॅप्लिकेशन (ओआर्ए) http://www.upsconline.nic.in  या संकेतस्थळावर १४ जुलै २०१६ पर्यंत करावेत.

अभियांत्रिकी पदवीधरांची भारतीय नौसेनेत एक्झिक्युटीव्ह ब्रांच – (ए) जनरल सव्‍‌र्हिस ब्रांच, (बी) पायलट, (सी) ऑब्र्झव्हर, (डी) माहिती तंत्रज्ञान, (ii) टेक्निकल ब्रांच – (ई) इंजिनियरींग ब्रांच, (एफ्) इलेक्ट्रिकल ब्रांच, (जी) नेव्हल आर्किटेक्चर, (iii) सबमरिन टेक्निकल ब्रांच – (एच्) इंजिनियरींग ब्रांच, (आय्) इलेक्ट्रिकल ब्रांच (युनिव्हर्सटिी एन्ट्री स्कीम) अंतर्गत कोर्ससाठी निवड. कोर्स जून २०१७ पासून सुरू होणार. एक्झिक्युटीव्ह जनरल सíव्हस ब्रांचसाठी पर्मनंट/शॉर्टसíव्हस कमिशन आणि इतर सर्व पदांना (बी) ते (आय्) साठी शॉर्टसíव्हस कमिशन मिळणार. पायलट आणि ऑब्र्झव्हर आणि नेव्हल आर्किटेक्चर पदांसाठी पुरुष आणि महिला दोन्ही पात्र आहेत. इतर सर्व पदांसाठी फक्त पुरुष उमेदवार पात्र. पात्रता – पायलट आणि ऑब्र्झवर पदांसाठी कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी आणि इतर पदांसाठी संबंधित अभियांत्रिकी पदवी. पदवीला सरासरी किमान ६० टक्के गुण आवश्यक. वयोमर्यादा – २१ ते २४ वष्रे (१ जुल २०१७ रोजी) निवड पद्धती – नेव्हल कँपस सिलेक्शन टीमसमोरील मुलाखतीतील यशस्वी उमेदवारांना सव्‍‌र्हिस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीला सामोरे जावे लागेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज http://www.joinindiannavy.gov.in  या संकेतस्थळावर ७ जुलै २०१६ पर्यंत करावेत.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांची पुढील पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अधिसूचना २०१६-१७ जारी (i) पशुवैद्यकीय (बी.व्ही.एस्सी. अँड ए.एच्.) (ii) मत्स्य विज्ञान (बी.एफ्.एस्सी.) व (iii) दुग्धतंत्रज्ञान (बी.टेक्. (दु.तं.)) पात्रता –  (i)  पशुवैद्यकीय आणि (ii) मत्स्यविज्ञानसाठी – भौतिकशास्त्र, रसायनशस्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषयात एकत्रितपणे १२ वी किमान ४९.५० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (iii) दुग्धतंत्रज्ञानसाठी – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी या विषयांमध्ये एकत्रितपणे १२ वी ४९.५० टक्के गुणांसह उत्तीर्ण. तिनही अभ्यासक्रमांसाठी राखीव प्रवर्गाकरिता गुणांची अट आहे ३९.५० टक्के. प्रवेश अर्ज शुल्क १००० रुपये. अराखीव प्रवर्गाकरिता, (राखीव प्रवर्गाकरिता ७०० रुपये) ऑनलाईन पद्धतीनेच भरावे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज http://www.mafsu.in  या संकेतस्तळावर ५ जुलैपर्यंत भरावेत. (मत्स्यविज्ञान आणि दुग्धतंत्रज्ञानासाठी) पशुवैद्यकीय पदवीसाठीचे अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे ७ जुल २०१६.