महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाने इतिहासाचा अभ्यास करायचा झाला तर, सर्वप्रथम या इतिहासाची विभागणी करावी लागेल. ही विभागणी सहा भागांत करता येईल.

 महाराष्ट्राची पाश्र्वभूमी

mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण
NCERT tweaks Class 12th History book: Harappans indigenous, doubts over Aryan migration
एनसीईआरटी अभ्यासक्रमात बदल; ‘आता आर्य भारतातलेच’, काय सांगते नवे संशोधन?
Who was Ramses II
विश्लेषण: गेल्या अनेक वर्षांपासूनचे कोडे आता उलगडणार? कोण होता रामसेस दुसरा? का आहे जगाला त्याचे आकर्षण?
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

इसवि सनपूर्व तिसऱ्या शतकातील अशोकाचे शिलालेख व इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकातील सातवाहनांच्या नाणेघाटातील शिलालेखावर असलेला ‘महारठ्ठ’ हा शब्द महाराष्ट्र प्रदेशातील लोकांसाठी वापरला असल्याचे दिसून येतो. हे पुरावे महाराष्ट्राच्या अस्तित्वासंबंधी सर्वात जुने पुरावे समजले जातात. येथूनच महाराष्ट्राच्या इतिहासाला सुरुवात होते. तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये काही प्राचीन संस्कृतीदेखील अस्तित्वात होत्या त्यांची ठिकाणे, प्राचीन नावे, वैशिष्टय़े, लिहून काढणे फायद्याचे ठरेल, शक्य असल्यास ही ठिकाणे नकाशावरती नोंदवावीत म्हणजे लक्षात ठेवणे सोपे जाते.

सातवाहन कालखंडापासून (इसवी सनपूर्व २३०-इसवी सन २३०) महाराष्ट्राला स्वत:ची ओळख प्राप्त झाली असे म्हणावयास हरकत नाही.

अ) सातवाहन घराणे/ सातवाहन राजवट (कालखंड -इसपू २३० -इस २३०) संस्थापक – सिमूक.

सातवाहन घराण्याचे किंवा त्यापुढील सर्व घराण्याचे अभ्यास करीत असताना पुढील बाबींचा तुलनात्मक अभ्यास करणे फायद्याचे ठरते.

* घराणे/राजवटीचा कालखंड

* घराणे/राजवटीचा संस्थापक

* घराणे/राजवटीचे महत्वाचे राजे

* घराणे/राजवटीच्या शाखा व त्याचे प्रमुख

* राजधानी (आर्थिक/सांस्कृतिक)

* घराणे/राजवटीच्या कालखंडात आर्थिक,   सामाजिक स्थिती

* घराणे/राजवटीच्या कालखंडातील महत्वाच्या   घटना – प्रमुख युद्ध वगैरे*  घराणे/राजवटीच्या कालखंडाची प्रमुख निर्मिती

या सर्व बाबींचा अभ्यास तुलनात्मक करणे गरजेचे.

सातवाहनानंतर येणाऱ्या प्राचीन घराणे/राजवटीचा क्रम पुढीलप्रमाणे

ब) वाकाटक : कालखंड – इ.स.२७०- इ.स. ३३० (६०वर्षे) संस्थापक – विंध्यशक्ती

शाखा २

* ज्येष्ठ शाखा

* वात्सगुल्म शाखा

क) बदामाचे चालुक्य : पहिला राजा : जयसिंह आणि चालुक्य घराण्याची पायाभरणी पुलकेशी प्रथम

ड) राष्ट्रकूट घराणे : संस्थापक : दंतीदुर्ग.

ई) शिलाहार : शाखा ३

* दक्षिण कोकण : जीमुतवाहन

* उत्तर कोकण : कापर्दी

* कोल्हापूर</p>

फ) गोंड घराणे : संस्थापक कोल भील

महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासामध्ये वरील शासकांचा महत्त्वाचा वाटा दिसून येतो. प्रत्येक राजसत्तेची राज्य करण्याची पद्धत, आर्थिक, सामाजिक स्थिती यांचा परिणाम तत्कालीन सांस्कृतिक प्रगतीवर दिसून येतो, म्हणूनच वरील सर्व सत्तांचा अभ्यास करताना दिलेल्या मुद्दय़ांनुसार एकत्रित अभ्यास केल्यास निश्चितच फायदा होतो.

*   मध्ययुगीन महाराष्ट्र

महाराष्ट्रातील प्राचीन सत्तांनी महाराष्ट्र या प्रदेशाला अस्तित्व मिळवून दिले; तर महाराष्ट्रातील मध्ययुगीन सत्तेने आपले अस्तित्व इतर परकीय प्रदेशाला जाणवून दिले.

बाराव्या शतकापूर्वी परकीय आक्रमक साहसा या प्रदेशात प्रवेश करीत नसत कारण हिंदुस्थानावर आक्रमण करून मिळणारी संपत्ती आपल्या प्रदेशात नेणे एवढेच त्यांचे ध्येय होते. दुसरे कारण म्हणजे विंध्य आणि सातपुडा यांचा नैसर्गिक अडथळा परंतु सुलतानशाहीच्या कालावधीमध्ये देवगिरी वरचे आक्रमण हे संपत्ती व संपन्न भूप्रदेश ताब्यात घेण्यासाठी केले गेले.

१२९६मध्ये देवगिरीचे वैभव ऐकून अल्लाउद्दीन खिलजी याने पहिल्यांदा महाराष्ट्रातील प्रदेशात स्वारी केली व महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासाला सुरुवात झाली. मध्ययुगीन महाराष्ट्राचा अभ्यास करत असताना काही नवीन गोष्टींचा अभ्यास करावा लागतो तो म्हणजे

* महाराष्ट्रातील प्रमुख राजवट, वंशज, संस्थापक

*  कोणत्या राजाच्या कालावधीमध्ये आक्रमण  झाले?

* कोणता तह-करार झाला?

* संबंधित राजाचे प्रधान प्रमुख सरदार

* युद्धाचे परिणाम

*  आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवन.

*    मध्ययुगीन महाराष्ट्रातील प्रमुख राजवटी

कल्याणीच्या चालुक्यांच्या पाडावानंतर महाराष्ट्र, आंध्र व कर्नाटकमध्ये प्रादेशिक सत्तांचा उगम झाला त्यापैकी महाराष्ट्रामधील प्रमुख सत्ता म्हणजे यादव.

* यादव राजवट -मूळपुरुष – सुबाहू पुत्र ‘दृढप्रहर’.

यादवांचा पराभव करून अल्लाउद्दीन खिलाजीने सुलतानशाहीचा प्रसार दक्षिण भारतात केला व यानंतर उत्तरेतील शासकांनी दक्षिणेवर सत्ता प्रस्थापित करण्याची एकही संधी सोडली नाही. दरम्यानच्या कालावधीमध्ये महंमद-बिन-तुघलक याने देवगिरीला आपल्या साम्राज्याची राजधानी बनविण्याचा अयशस्वी प्रयत्नसुद्धा केला.

*  बहामनी राजवट – स्थापना – हसन गंगू बहामनी

बहामनी राजवटीचा शूर सरदार महंमद गवाण यांच्या मृत्यूनंतर पाच शाह्य़ांमध्ये झाली

१) वऱ्हाड : ईमादशाही, शासन प्रमुख: ईमादशाह

२) अहमदनगर : निजामशाही, शासन प्रमुख : अहमदशाह

३) विजापूर : आदिलशाही, शासन प्रमुख : युसुफ आदिलशाह

४) गोवळकोंडा : कुतुबशाही, शासन प्रमुख : कुतुबशाह

५) बिदर : बरीदशाही, शासन प्रमुख : बरीदशाह

वरील पाच शाह्य़ांचा तुलनात्मक अभ्यास फायद्याचा ठरतो. कारण या शाह्य़ा प्रदेश विस्तारांसाठी इतर शाह्य़ांवर आक्रमणे करत असत.

*   मराठा कालखंड (१६३०-१८१८)

महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्याचे व ते सिद्ध करीत असताना स्वत:चे वेगळेपण निर्माण करण्याचे श्रेय जाते मराठा राजवटीस. मराठा राजवटीची सुरुवात छत्रपती शिवाजी यांच्या स्वराज्य स्थापनेपासून होते व शेवट १८१८ मध्ये इंग्रजांमार्फत होतो. या कालखंडातील पराक्रमी राजे, त्यांचे शूर सरदार, मावळे यांचाही अभ्यास महत्त्वाचा आहे.

  वारकरी संप्रदाय

मध्ययुगीन राजवटीइतकाच संत परंपरा व वारकरी संप्रदाय व त्यातील संतांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्याही आधी पंथ पद्धती अस्तित्वात होती. हा महत्त्वाचा पंथ म्हणजे महानुभव पंथ. या पंथाचे मुळपुरुष गोविंदप्रभू होते. पण त्याचे प्रणेते आहेत श्री चक्रधर स्वामी. ज्ञान व भक्तीचा मिलाफ हे महानुभव पंथाचे वैशिष्टय़. याचप्रमाणे संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या तत्कालीन संत त्यांच्या रचना, त्यांची शिकवण पद्धती यांचा सारांश रूपाने अभ्यास करणे.

*    एकोणिसाव्या शतकातील प्रबोधन

१९व्या शतकात महाराष्ट्रातील परंपरागत रूढ असलेल्या समाजात वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था,

श्रेष्ठ-कनिष्ठ, स्पृश्य-असृश्य, इ. बाबतीत कडक र्निबध अस्तित्वात होते. ब्रिटिशांच्या आगमानाबरोबरच महाराष्ट्रामध्ये वैचारिक जागृती निर्माण झाली व खऱ्या अर्थाने प्रबोधनाला सुरुवात झाली.

यासाठी पुढील गोष्टींचा महत्त्वाचा वाटा दिसून येतो

*  पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव

* पाश्चात्त्य शिक्षणाचा प्रभाव

* ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कार्य

* धार्मिक सुधारणावादी चळवळी

या सर्वाचा अभ्यास करण्यासाठी आधी महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारकांचा अभ्यास करावा.

या समाजसुधारकांचा अभ्यास करीत असताना खालील पैलूंचा विचार केल्यास लक्षात ठेवणे सोपे जाते

* जन्म ठिकाण, मूळ ठिकाण

*  शिक्षण, नोकरी

*  स्थापन  केलेल्या संस्था, वृत्तपत्रे.

* महत्त्वाचे लिखाण, भाषण, घोषणा.

*  प्रबोधन कार्यासाठी दिलेले विशेष योगदान या पुढील घटकाचा अभ्यास आपण पुढील भागात पाहू.

रब्बेसलाम शेख