News Flash

एमपीएससी मंत्र : मुख्य परीक्षेनंतरची तयारी

मुख्य परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी पात्र ठरू किंवा नाही याचे अंदाज बांधत बसू नये.

परीक्षेच्या निकालाची चिंता न करता आपण मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणारच आहोत असे गृहीत धरून मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करावी.

राज्य लोकसेवा आयोगाची राज्यसेवा मुख्य परीक्षा नुकतीच झाली. मुख्य परीक्षा संपली की तीन-चार दिवसांची विश्रांती तर घ्यायलाच हवी. यानंतर मुलाखतीची तयारी व इतर स्पर्धा परीक्षांची पूर्व, मुख्य परीक्षानिहाय तयारी तुमच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू करावी.

मुख्य परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी पात्र ठरू किंवा नाही याचे अंदाज बांधत बसू नये. तर त्यासाठीची सर्वसाधारण तयारी सुरू ठेवावी. मुख्य परीक्षेत यशस्वी होणारे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतीलच. पण अयशस्वी झालेले उमेदवार पुढच्या प्रयत्नांसाठी ‘चार्ज’ राहतील. मुलाखतीची तयारी हा विषय केवळ वस्तुनिष्ठ स्वरूपाचा किंवा दीघरेत्तरी स्वरूपाचा एखादा पेपर सोडविण्यापुरता मर्यादित नाही. मुलाखतीचा थेट संबंध उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वाशी असतो. व्यक्तिमत्त्वाचा विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. त्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न आवश्यक असतात. नियुक्तीचे पद, त्यासाठी आवश्यक गुण, मुलाखतीचे पॅनल व सदस्य, उमेदवारांच्या तयारीचा व आत्मविश्वासाचा स्तर अशा अनेक मूर्त / अमूर्त गोष्टींवर मुलाखतीचा निकाल अवलंबून असतो. त्यामुळे योग्य पद्धतीने व नेमकेपणाने मुलाखतीची तयारी करणे आवश्यक असते.

राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा झाल्यानंतर सर्वच उमेदवारांना एकच सल्ला दिला होता, तो म्हणजे, पूर्व परीक्षेच्या निकालाची चिंता न करता आपण मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणारच आहोत असे गृहीत धरून मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करावी. जेणेकरून पूर्व परीक्षेत यशाने हुलकावणी दिली तरी, मधला काळ मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी वापरल्याने पुढच्या प्रयत्नांची आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठीची तयारी सुरक्षित झाली व स्पर्धेत आपली दावेदारी भक्कम झाली. स्पर्धा परीक्षा तयारीचे काही अतिरिक्त नियम आहेत. त्यापकी हा महत्त्वाचा नियम आहे, आयोगाच्या वेळापत्रकानुसार आपल्या अभ्यासाचे वेळापत्रक नेहमी गतिशील ठेवायला हवे. राज्य लोकसेवा आयोगाच्या प्रसिद्ध झालेल्या परीक्षांच्या अंदाजित वेळापत्रकात बदल हा नेहमीच ठरलेला असतो. पण म्हणून ‘जेव्हा होईल तेव्हा बघू’ असे धोरण आपल्या वेळापत्रकाचा भाग कधीच असू नये.

मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीचे निमंत्रण मिळणारच असे गृहीत धरून मुलाखतीची तयारी सुरू करायलाच हवी. मात्र त्याचबरोबर इतर काही स्पर्धा परीक्षांच्या मुख्य परीक्षाही पुढील दोन – तीन महिन्यांमध्ये होत आहेत. काही उमेदवार यातील काही परीक्षा देणार असतील. अभ्यासाच्या नियोजनासाठी या परीक्षांचे अद्ययावत वेळापत्रक देत आहोत.

*    न्यायदंडाधिकारी प्रथम स्तर मुख्य परीक्षा

– ८ ऑक्टोबर

*      महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा

(यांत्रिकी व विद्युत स्वतंत्र) – २६ नोव्हेंबर

*      महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा (स्थापत्य) – १७ डिसेंबर

*      महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा (यांत्रिकी व विद्युत एकत्र) – २४ डिसेंबर

*      पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा – ५ नोव्हेंबर

* साहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा – १० डिसेंबर

*      महाराष्ट्र कृषी सेवा  मुख्य परीक्षा – १७ डिसेंबर

*      कर साहाय्यक मुख्य परीक्षा – ३१ डिसेंबर

*      विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा -७ जानेवारी

हे वेळापत्रक आणि तुम्ही उत्तीर्ण झालेल्या पूर्व परीक्षा यांचा व्यवस्थित आढावा घेऊन पुढचे वेळापत्रक आखून घ्यावे.

या सर्व परीक्षांच्या अभ्यासक्रमातील ओव्हरलॅप होणाऱ्या मुद्दय़ांची तयारी एकत्रितपणे आधी करावी. उदा. भारताची राज्यघटना ही सर्वव्यापी बाब आहे. त्यानंतर त्या त्या परीक्षेच्या वेळेप्रमाणे उजळणी करावी. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडी नावाचा घटक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कार्यरत असतो. या परीक्षांशी संबंधित महत्त्वाच्या चालू घडामोडींची परीक्षोपयोगी चर्चा तसेच या प्रस्तावित परीक्षांच्या तयारीसाठीची चर्चा पुढील काही लेखांमध्ये करणार आहोत.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांनी अब्राहम लिंकनचे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, ‘यशाच्या ध्येयाप्रति प्रयत्नरत उमेदवाराच्या प्रवासात, यशाच्या संकल्पाशिवाय दुसरी कोणतीही बाब महत्त्वपूर्ण असू शकत नाही.’

राज्यसेवा परीक्षेची मुलाखत आणि त्याच वेळी इतर स्पर्धा परीक्षांचे प्रयत्न असे मल्टी टास्किंग करणे ही, उद्याचे प्रशासकीय अधिकारी म्हणून तुमच्या भविष्याची पूर्वतयारी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2017 5:18 am

Web Title: proper guidance for mpsc exams preparation
Next Stories
1 करिअरमंत्र
2 नोकरीची संधी
3 यूपीएससीची तयारी : जागतिकीकरणाचा प्रभाव
Just Now!
X